येलकी ग्रामपंचायत निवडणूक

येलकी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सरळ लढतीत रणजित मोरे विजयी

Yelki Gram Panchayat Election: येलकी ग्रामपंचायत सरपंच पदावर रणजित मोरे यांची निवड झाली. त्यांनी 665 मते मिळवून स्पर्धक संजय भुरके यांच्यावर मात केली. निवडणूकीत एकूण 24 मते नोटाला मिळाले.

येलकी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सरळ लढतीत रणजित मोरे विजयी

Yelki Gram Panchayat Election

 

काळ्याची वाडी 4 सदस्य बिनविरोध

आखाडा बाळापूर (Yelki Gram Panchayat Election) : कळमनुरी तालुक्यातील येलकी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले 29एप्रिल रोजी निवडणूक निकाल घोषित झाला.अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत रणजित मोरे यांनी विजय मिळवून बाजी मारली.
 
कळमनुरी तालुक्यातील येलकी मोठी ग्रामपंचायत (Yelki Gram Panchayat Election) असुन येथील सरपंच पद अ.ज.राखीव आहे अडीच वर्षापूर्वी सरपंचपदी निवडून आले त्यांनी राजीनामा दिला होता यामुळे दोन वर्षापासून सरपंचपद रिक्त होते उपसरपंच यांच्याकडे पदभार होता. दरम्यान इतर ग्रामपंचायत पोटनिवडणूक प्रमाण येथील सरपंचपद पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यात सरपंच पदासाठी  भुरके संजय मदन व मोरे रणजित गंगाराम दोन उमेदवारांत सरळ लढत झाली. थेट जनतेतून सरपंच निवड होणाऱ्या निवडणूकीत कोण बाजी मारतो याकडे येलकी व परिसरातच लक्ष वेधले गेले होते .या निवडणुकीत मोरे रणजित गंगाराम हे थेट जनतेतून 665 मते घेऊन सरपंच म्हणून निवडून आले तर भुरके संजय यांना 471 मतदान मिळाले. या निवडणुकीत नोटाला 24 मतदान मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भगवान झरकर यांनी काम पाहिले.

दरम्यान येलकी बरोबर काळ्याचीवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणूक (Yelki Gram Panchayat Election) होते. यात उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काळ्याचीवाडी ग्रामपंचायत 6 सदस्य पोटनिवडणुकीसाठी शोभा  कृष्णा खंदारे अ.ज.स्त्री,सखाराम माधव शेळके, अ.ज.,हिरा रघुनाथ फोपसे स.सा.स्त्री,रवी कीशन काळे अ.जा.हे चार अर्ज आले होते यामुळे बिनविरोध निवड झाली तर दोन सदस्य पद रिक्त आहे.येथे 6 जागा पैकी 5 जागा अर्ज आले होते एक अर्ज अवैध ठरला होता.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026