वीज दुरुस्तीनंतर आता सिद्धेश्वर येथील पंप व मोटारी मध्ये तांत्रिक बिघाड

दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका वीज वितरण यंत्रणेसह पाणीपुरवठा योजनेलाही बसला आहे.

वीज दुरुस्तीनंतर आता सिद्धेश्वर येथील पंप व मोटारी मध्ये तांत्रिक बिघाड

Power Failure

हिंगोलीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

हिंगोली (Power Failure) : दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका वीज वितरण यंत्रणेसह पाणीपुरवठा योजनेलाही बसला आहे. पावसादरम्यान 33 केव्ही वीजवाहिनीवर वीज कोसळल्याने इन्सुलेटर फुटला आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सदर वाहिनीवरील बिघाड शोधून रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम घेत वीजपुरवठा पूर्ववत केला.

वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सिद्धेश्वर येथील पाणीपुरवठा योजनेची मोटर सुरू करण्यात आली. मात्र, जवळपास दोन तास पंप सुरू असूनही पाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी मोटर व मुख्य जलवाहिनीची पाहणी केली असता पंप व मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.

सदर बिघाडाची माहिती तात्काळ संबंधित तांत्रिक विभागास कळविवण्यात आली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होताच सिद्धेश्वर व परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी

चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी

Project illegal water supply: तालुक्यात पर्जन्यमान अपुरे झाल्यामुळे जलाशय, तलाव, नदी, कालवे व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर

Oct 06, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026