प्रकल्प अवैध पाणी उपशा

चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी

Project illegal water supply: तालुक्यात पर्जन्यमान अपुरे झाल्यामुळे जलाशय, तलाव, नदी, कालवे व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर

चिखली तालुक्यात जलस्त्रोत, तलाव व प्रकल्पांतील अवैध पाणी उपशावर कडक बंदी

Project illegal water supply

 

तहसीलदारांकडून विशेष भरारी पथकांची नियुक्ती, गुन्हे दाखल करण्याचा इशारा

​चिखली (Project illegal water supply) : सन २०२६ मध्ये तालुक्यात पर्जन्यमान अपुरे झाल्यामुळे जलाशय, तलाव, नदी, कालवे व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चिखली तालुक्यातील सर्व जलस्त्रोतांसह डोंगरशेवली व ब्राह्मणवाडा लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याचा अनधिकृत व बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय सवडे यांनी दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष आदेश (क्रमांक/कावि/नै.आ./५१०/२०२६ व ५११/२०२६) जारी केले आहेत. या आदेशान्वये तालुक्यातील जलस्त्रोतांसाठी आणि विशेष प्रकल्पांसाठी स्वतंत्र भरारी पथके (Flying Squads) गठीत करण्यात आली आहेत.

​भरारी पथकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक:
​१. डोंगरशेवली प्रकल्प भरारी पथक:

​आर. एम. शिंदे (शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचन शाखा, चिखली) – पथक प्रमुख (मो. ८८०५४४१८८३)

प्रविण जाधव (शाखा अभियंता, महावितरण, शाखा कार्यालय शेंबा) – सदस्य (मो. ७८७५७६३५७४)

जयसिंग राजपूत (पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अमडापूर) – सदस्य (मो. ९९६०८७६८६९)

​ संजय सरागे (मंडळ अधिकारी, धोडप) – सदस्य (मो. ९०११०४४८४७)

​ व्ही. बी. कोळसे (ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, डोंगरशेवली) – सदस्य (मो. ९६८९३३३१९६)

​ व्ही. एस. शेळके (ग्राम पंचायत अधिकारी/सचिव, डोंगरशेवली) – सदस्य (मो. ९५४५३०४०७२)

​ डी. यू. सावळे (ग्राम पंचायत शिपाई, डोंगरशेवली) – सदस्य (मो. ८८०६०५६०५१)

​२. ब्राह्मणवाडा लघु पाटबंधारे प्रकल्प भरारी पथक:

 एम. बी. मिरकुटे (शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचन शाखा, उदयनगर) – पथक प्रमुख (मो. ८६६८३३६६३१)

​कोकवडे (शाखा अभियंता, महावितरण, शाखा कार्यालय अमडापूर) – सदस्य (मो. ७८७५३५२३३०)

​ किशोर मोरे (मंडळ अधिकारी, अमडापूर) – सदस्य (मो. ७३८७५७८७५४)

​ जयसिंग राजपूत (पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अमडापूर) – सदस्य (मो. ९९६०८७६८६९)

​भुषण काळे (ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, अमडापूर भाग-३) – सदस्य (मो. ८४८५०९२६९९)

​शरद काळे (ग्राम पंचायत अधिकारी/सचिव, अमडापूर) – सदस्य (मो. ९९२३३३२४४८)

​ राजु बावणे (ग्राम पंचायत शिपाई, अमडापूर) – सदस्य (मो. ९०२११२१४२८)

​३. तालुक्यातील सर्व तलाव व जलस्त्रोत भरारी पथक:

​पथक प्रमुख (मृद व जलसंधारण विभाग):
​ एस. एस. खरपास (सहा. अभियंता श्रेणी-२, मृद व जलसंधारण, जि.प. उपविभाग, बुलढाणा) - मो. ९८९०८८५४६३
ए. एस. पाटील (कनिष्ठ अभियंता, मृद व जलसंधारण, जि.प. उपविभाग, देऊळगाव राजा) - मो. ९०४९४९६१६७
 स्नेहलता खामकर (कनिष्ठ अभियंता, मृद व जलसंधारण उपविभाग, चिखली) - मो. ७८८७९६३८६१
मनोज देठे (कनिष्ठ अभियंता, मृद व जलसंधारण उपविभाग, चिखली) - मो. ८३२९१६३३१६
६३३१६

​पोलीस प्रशासन (संबंधित पोलीस ठाणे अधिकारी):
 भुषण गावडे (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन चिखली) - मो. ९९२२८०७८६१
 जयसिंग राजपूत (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन अमडापूर) - मो. ९९६०८७६८६९
​रूपेश शक्करगे (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन अंढेरा) - मो. ९९२३७५६१४३
 निलेश सोळुके (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन रायपूर) - मो. ८८८८८६१४१८
६१४१८

​महावितरण विभाग अधिकारी व कर्मचारी:
​ प्रविण जाधव (उपअभियंता, महावितरण, बुलढाणा) - मो. ७८७५७६३५७४
 पडघान (कनिष्ठ अभियंता, महावितरण, मेरा) - मो. ७८७५७६३५८३
 प्रताप कदम (प्रधान तंत्रज्ञ, महावितरण, मेरा) - मो. ९८५०५२२१८७
​ भिमटे (सहाय्यक अभियंता, महावितरण, चिखली ग्रामीण २) - मो. ७०३०९०६८८४
​संदीप जाधव (प्रधान तंत्रज्ञ, महावितरण, चिखली ग्रामीण २) - मो. ७३९७९८४१७७
७९८४१७७

​महसूल विभाग (संबंधित मंडळ अधिकारी):
 किशोर मोरे (मंडळ अधिकारी, अमडापूर) - मो. ८४५९३६१४७४
मंगल सवतकर (मंडळ अधिकारी, उदयनगर) - मो. ९८२२६४०५६५
नितिन काळे (मंडळ अधिकारी, कोलारा व हाटणी) - मो. ९६७३८१९९१४
 संजय चौधरी (मंडळ अधिकारी, चांधई) - मो. ९९७५२९०६२७
भगवान पवार (मंडळ अधिकारी, चिखली) - मो. ९७६३३१८७५७
​संजय सरागे (मंडळ अधिकारी, धोडप) - मो. ९०११०४४८४७ (याशिवाय संबंधित पेठ, एकलारा, मेरा खुर्द, शेलगाव अटोळ मंडळांचे मंडळ अधिकारी, संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) व ग्रामपंचायत शिपाई यांचाही या पथकात समावेश आहे.)
वेश आहे.)

​कडक कायदेशीर कारवाई व कडक निर्देश:
​मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या ३० सप्टेंबर २०२६ च्या पत्रातील निर्देशानुसार ही विशेष कारवाई राबवण्यात येत आहे.

​आकस्मिक व नियमित तपासणी: भरारी पथके तालुक्यातील सर्व जलाशय, नदी, तलाव, कालवे, बंधारे व प्रकल्पांमधील जलसाठ्याची नियमित आणि अचानक (Randomly) पाहणी करतील.

​कडक कायदेशीर पावले: महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ व केंद्रीय विद्युत कायदा २००३ मधील तरतुदींनुसार अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर खालीलप्रमाणे कारवाई केली जाईल:
​अनधिकृत पाण्याचे विद्युत व डिझेल पंप संच तात्काळ जप्त करणे.
​बेकायदेशीरपणे घेतलेली वीज जोडणी (Power Connection) खंडित करणे.
​नियमबाह्य उपसा करणाऱ्यांवर आर्थिक दंड आकारणे.
​संबंधितांवर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे.

​सदर कारवाईचा शेतकरीनिहाय पंचनामा अहवाल दर गुरुवारी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलढाणा व तहसील कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय सवडे यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या धडक भूमिकेमुळे तालुक्यातील जलस्त्रोतांवर बेकायदेशीरपणे पंप लावून पाण्याचा उपसा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.