परभणी पोलिस कारवाई

कंटेनरमध्ये २७ जनावरांची अमानुष वाहतूक परभणी पोलिसांनी केली कारवाई...!

Parbhani Police Action: परभणीतील दैठणा पोलिसांनी कंटेनरमध्ये अमानुषपणे वाहतूक केलेल्या २७ जनावरांची सुटका केली. कारवाईत तीन आरोपींवर गुन्हा दाखल.

कंटेनरमध्ये २७ जनावरांची अमानुष वाहतूक परभणी पोलिसांनी केली कारवाई...!

Parbhani Police Action

परभणीतील दैठणा पोलीसांची कारवाई अंदाजित ३४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त....!

परभणी (Parbhani Police Action) : तालुक्यातील दैठणा परिसरात जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणार्‍यांविरुद्ध दैठणा पोलिसांनी धडक कारवाई केली. सोमवार १३ एप्रिल रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास पाथरी– पोखर्णी मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, (Parbhani Police Action) पाथरीकडून पोखर्णीकडे जाणार्‍या कंटेनर एमएच ०४ जेयू ९६४८) मध्ये २७ जनावरे (गाय व बैल) अत्यंत अमानुषपणे भरून नेली जात असल्याची माहिती दैठणा पोलिसांना रात्री गस्तीदरम्यान मिळाली.या माहितीच्या आधारे दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, चालक विलास भवुरे व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनर अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये जनावरांना कोणतीही सोय न करता निर्दयपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ २७ जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

या (Parbhani Police Action) कारवाईत कंटेनरसह जनावरे असा एकूण अंदाजे ३४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित चालक व अन्य आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच इतर संबंधित कलमांनुसार तीन आरोपी साहिल सनोफ अब्दुल करीम रा. जोसई जिल्हा मुझपरनगर उत्तर प्रदेश,तोफिक अब्दुल करीम शेख रा. वागारी तालुका जामनेर जिल्हा जळगाव,सावेज अहसान कसार रा.मानोना जिल्हा सारंगपूर उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास दैठणा पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार: आ. डॉ.गुट्टे    

परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार: आ. डॉ.गुट्टे    

Parbhani Jayakwadi Project: यावर्षी पावसाअभावी खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातातुन गेली असुन नोव्हेंबर महिन्यातच नागरिकांसह जनावरांच्या चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Nov 13, 2026
परभणीत कंटेनरमधून गोवंशाची होणारी अवैध वाहतुक उघड...!

परभणीत कंटेनरमधून गोवंशाची होणारी अवैध वाहतुक उघड...!

Parbhani Illegal cattle transport: पालम तालुक्यातील  स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवार ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पालम ते मरडसगाव रोडवर एक संशयास्पद कंटेनर जप्त केला.

Nov 12, 2026
परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे घंटानाद आंदोलन....!

परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे घंटानाद आंदोलन....!

Parbhani ST Employees' Protest: महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाथरी आगारासमोर कर्मचार्‍यांचा घंटानाद आंदोलन..

Nov 03, 2026
परभणीत शिवीगाळ जीवावर बेतली; युवकाचा चाकुने भोसकून खून...!

परभणीत शिवीगाळ जीवावर बेतली; युवकाचा चाकुने भोसकून खून...!

Parbhani murder case: तु नेहमीच जोर जोराने शिवीगाळ का करतोस, आमच्या घरात आई, बहिणी आहेत, असे म्हणत राग मनात धरुन युवकाला घराबाहेर नेत चाकुने भोसकण्यात आले.

Nov 03, 2026
शेतात गांजाची लागवड; १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त!

शेतात गांजाची लागवड; १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त!

रतनवाडी येथे गांजाची लागवड उघड; मानोरा पोलिसांची कारवाई, १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त, ७० वर्षीय शेतकरी ताब्यात.

Nov 03, 2026