पतंजली अथर्व लॉन योग

निरोगी जीवनासाठी नियमित योग करा -डॉ. व्यंकटेश नंदनकर 

Patanjali Yoga: हिंगोलीमध्ये डॉ. व्यंकटेश नंदनकर यांनी नियमित योगाच्या महत्त्वावर भर दिला. पतंजली योग वर्गाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी योगाच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन केले.

निरोगी जीवनासाठी नियमित योग करा -डॉ. व्यंकटेश नंदनकर 

Patanjali Yoga

पतंजलीच्या अथर्व लॉन योग वर्गाचा सातव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

हिंगोली (Patanjali Yoga) : निरोगी जीवन सर्वांना पाहिजे असते परंतु त्यासाठी प्रयत्न फार कमी लोक करतात आणि घरच्या मोठ्या व्यक्तींकडे पाहून पुढची पिढी शिकत असते त्यामुळे वडीलधाऱ्या सर्व मंडळींनी लहान मुलांना सोबत घेऊन योग करावा व निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन मुख व दंत रोग तज्ञ डॉ. व्यंकटेश नंदनकर यांनी केले.

 सव्वीस एप्रिल रोजी श्रीनगर भागातील पतंजलीच्या अथर्व लॉन योग वर्गाचा सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पतंजली भारत स्वाभिमानचे राज्यसह प्रभारी कुंडलिकराव निर्मले, जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंके, पतंजली योग पीठाचे  (Patanjali Yoga) आजीवन सदस्य सुधाकर माळकर यासह पतंजलीचे पदाधिकारी व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्गात नियमित योग मार्गदर्शन करणाऱ्या मुख्य योग शिक्षकांपैकी जिल्हा कोषाध्यक्ष उमेश तोष्णीवाल, सुषमा होकरणे, रमेश काळे यांचा देखील या वेळेस सत्कार करण्यात आला. मानवी जीवनामधील दातांचे कार्य व त्यांना निरोगी ठेवण्यासाठी डॉ. नंदनकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

राज्यसह प्रभारी कुंडलिकराव निर्मले यांनी देखील प्रसंग उचित मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामन टाकळगव्हाणकर, बालाजी वजीरे,आनंद पठाडे, नारायण भाकरे, विशाल शेटे, शेषराव जाधव, गजानन देशमुख, सुनील गुंडेवार, गजानन सावके,राजेश अग्रवाल, लता अग्रवाल, रेखा अग्रवाल,मंजू बगडिया, मनीषा तोष्णीवाल, राखी चौरसिया, तेजस्विनी टाकळगव्हाणकर, स्वाती वरखेडकर, मंगल काळे, अर्चना खंदारे, सुनिता जयस्वाल, छाया कोल्हे, रिता अग्रवाल, कौशल्य कराळे, पार्वती भिसे, प्रणिता भाकरे, पुष्पा जाधव, सुकेशनी ढवळे,अश्विनी शेटे   आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026