नि:शुल्क योग शिबिर

नांदेडमध्ये लट्ठपणा निवारणासाठी नि:शुल्क योग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

Free Yoga Camp: नांदेडमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि स्वामी विवेकानंद योग केंद्राच्या संयुक्त आयोजनात विशेष नि:शुल्क योग शिबिर सुरू झाले आहे.

नांदेडमध्ये लट्ठपणा निवारणासाठी नि:शुल्क योग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

Free Yoga Camp

​नांदेड (Free Yoga Camp) : वाढत्या लट्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि स्वामी विवेकानंद योग केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दीप नगर येथील हनुमान मंदिर परिसरात २६ मार्च ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ५ ते ७ या वेळेत हे नि:शुल्क शिबिर पार पडणार आहे.

या (Free Yoga Camp) शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगपटू किशनराव भवर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योग प्राध्यापक डॉ. मधुकर भारती उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचा रितसर प्रारंभ करण्यात आला.
​
या (Free Yoga Camp) कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य योग शिक्षिका अर्चना तोटावाड यांनी केले, तर सूत्रसंचालन सुरेश हाडोळीकर यांनी प्रभावीपणे सांभाळले. या प्रसंगी शरद सोडेगावकर, योगिता शिराढोणकर, सोपानराव काळे आणि राघव दन्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.​हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आनंद कोकाटे, मीरा स्वामी, अरुण घोडसे, सुरेखा भोसीकर, कोमल जाधव आणि भानुदास गिते हे परिश्रम घेत आहेत.
​
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि योग प्रेमींनी या (Free Yoga Camp) नि:शुल्क संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन योग वर्गातर्फे करण्यात आले आहे. वाढते वजन आणि त्यातून निर्माण होणारे आजार रोखण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

संबंधित सामग्री

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026