आधार कार्ड

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card

माहूर (Nanded Aadhar card) : गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र संचालक यांनी प्रक्रिया पूर्ण करूण गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड पासुन वंचित असलेल्या दालपे यांना अखेर तहसीलदार अभिजित जगताप यांच्या हस्ते अधार कार्ड वितरित करण्यात आले 

पंधरा वर्षांपासून अधार कार्ड (Nanded Aadhar card) काढण्यासाठी धडपडत असलेले संजय दालपे यांना अधार कार्ड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे शासकीय कागदपत्रे, विविध योजनांचा लाभ तसेच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार अभिजीत जगताप यांनी मार्गदर्शन करून संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुढाकार घेत तहसीलदारांच्या मार्गदर्शनानुसार सेतू केंद्र संचालक नितीन हातमोडे यांनी आवश्यक बाबींची व तांत्रिक पूर्तता करून आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली.

त्यानंतर संजय दालपे यांचे नवीन आधार कार्ड तयार झाल्यानंतर तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या हस्ते संजय डोमाजी दालपे यांना आधार कार्ड वितरित करण्यात आले. तब्बल १५ वर्षांनंतर आधार कार्ड मिळाल्याने दालपे यांनी समाधान व्यक्त केले.

टैग्स: Nanded Aadhar card