धनुष कबाडे कांस्यपदक

पृथ्वी प्रणालीची आंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर या धनुष कबाडे च्या प्रकल्पाला कांस्यपदक

Dhanush Kabade Bronze Medal: धनुष कबाडे याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून कांस्यपदक जिंकले.

पृथ्वी प्रणालीची आंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर या धनुष कबाडे च्या प्रकल्पाला कांस्यपदक

Dhanush Kabade

हिंगोली (Dhanush Kabade Bronze Medal) : वसमत येथील रहिवाशी असलेले पोलीस अंमलदार महारुद्र कबाडे यांचा मुलगा व नांदेड शहरातील ज्ञान भारती विद्या मंदिर, नांदेड येथील सहावीतील विद्यार्थी धनुष महारुद्र कबाडे (Dhanush Kabade) याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेची तिसरी फेरी पार करून अंतिम तोंडी परीक्षेमध्ये मुंबई येथे कांस्यपदक प्राप्त केले.  डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण क्षमता व तार्किक विचारांची चाचणी घेणारी प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. धनुषणे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळविले आहे. 

तिसऱ्या फेरी मध्ये सादर करावयाच्या प्रकल्पासाठी धनुषने (Dhanush Kabade) पृथ्वी प्रणालीची अंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर हा विषय निवडला होता. या प्रकल्पासाठी त्याने विविध ठिकाणी भेटी घेऊन माहिती संकलित केली व त्यावर अभ्यास करून पाण्याचा वापराबाबत सविस्तर विश्लेषण केले. त्याच्या यशा बद्दल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून कौतुक करण्यात आले.  तसेच वरील प्रकल्पासाठी त्यास ज्ञान भारती विद्या मंदिराचे अध्यक्ष वाकोडे पाटील, आदित्य तुंगेनवर, श्रीमती जोशी, वर्गशिक्षक नगरे,  सातारे व आई-वडील स्नेहलता महारुद्र कबाडे, काका सुनील कबाडे, तसेच  बालाजी गोदरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

संबंधित सामग्री

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026