आ. संतोष बांगर

...अखेर आ. संतोष बांगर यांच्या मध्यस्थीने मेथा येथे वयोवृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार

MLA Santosh Bangar: मेथा येथे सौर उर्जा प्रकल्पामुळे स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर झाला. आ. संतोष बांगर यांच्या मध्यस्थीने वयोवृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारास परवानगी मिळाली.

...अखेर आ. संतोष बांगर यांच्या मध्यस्थीने मेथा येथे वयोवृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार

MLA Santosh Bangar

हिंगोली (MLA Santosh Bangar) : औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा येथे आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी प्रशासनाला व सोलार प्लांट वाल्यांना धारेवर धरत मयत बायनाबाई नामदेव सावळे या महिलेचा दिवसभर राखलेला अंत्यविधी ९ एप्रिल गुरुवार रोजी पार पडला.

औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या जागेमुळे स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावातील वयोवृद्ध महिलेच्या निधनानंतर अंत्यसंस्कारा साठी जागा नसल्याने गावकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. मेथा येथील बायनाबाई नामदेव सावळे वय ८० यांचे शुक्रवारी निधन झाले गावात पिढ्यानपिढ्या असलेल्या स्मशानभूमीची जागा सौर उर्जा प्रकल्पासाठी देण्यात आल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला गावकऱ्यांनी येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

हि माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी समजताच त्यांनी पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयास कळवले त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हि जागा प्रकल्पास दिल्याचे सांगत अंत्यसंस्कारास नकार दिला. गावकऱ्यांनी आ. संतोष बांगर यांना ही गंभीर बाब सांगताच आ. बांगर (MLA Santosh Bangar) यांनी मेथा येथे धाव घेत जिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदार व पोलीस प्रशासनाला धारेवर धरत मृतदेहाची अवहेलना केल्यास गाठ माझ्याशी आहे तसेच गोरगरीब जनतेसाठी मी माझ्या अंगावर गुन्हे घ्यायला देखील तयार आहे अशी भूमिका घेत मयत बायनाबाई सावळे यांचा दिवसभर रखडलेला अंत्यविधी स्वतः गावकऱ्यांच्या मदतीने पार पाडला.

आ. बांगर (MLA Santosh Bangar) यांनी प्रशासनाशी चर्चा केली. संबंधित जागा पारंपरिक स्मशानभूमी असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मध्यस्थी ली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर त्या ठिकाणी अंत्यसंस्कारास परवानगी मिळाली आणि प्रश्न निकाली निघाला. या घटनेने स्मशानभूमीचा कायमस्वरूपी प्रश्न ऐरणीवर आला आहे. २५ मार्च रोजी पाहणी होऊनही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित सामग्री

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात

Sep 30, 2026
श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Sep 26, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये

Sep 21, 2026
हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

MLA Santosh Bangar: हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर

Sep 08, 2026
उद्या आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी

उद्या आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी

Hingoli Kavad Yatra: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कळमनुरी ते हिंगोली पर्यत कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त २४ ऑगस्टला ही कावड यात्रा

Aug 23, 2026