Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली कावड यात्रा

उद्या आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी

Hingoli Kavad Yatra: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कळमनुरी ते हिंगोली पर्यत कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त २४ ऑगस्टला ही कावड यात्रा


उद्या आ संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी

Hingoli Kavad Yatra |

हिंगोली (Hingoli Kavad Yatra) : शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कळमनुरी ते हिंगोली पर्यत कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त २४ ऑगस्टला ही कावड यात्रा काढली जाणार आहे. कावड यात्रेत लाखो शिवभक्तांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे.

आज २४ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी कळमनुरी शहराजवळील चिंचाळेश्वर महादेव मंदिरात पुजा, अर्चा झाल्यानंतर भव्यदिव्य कावड यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही कावड यात्रा कळमनुरी शहरातील मुख्यरस्त्यावरून हिंगोलीकडे मार्गक्रमण करणार आहे. हिंगोलीतील नांदेड बायपासवर या कावड यात्रेचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे. ही यात्रा महाराजा अग्रसेन चौकातून महात्मा गांधी चौैकात सायंकाळी पोहचणार आहे. या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमात संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांच्यासह अनेक खासदार, आमदार व मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे. 

कावड यात्रेनिमित्ताने (Hingoli Kavad Yatra) कळमनुरी शहरापासून हिंगोली शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. ज्या ज्या मागार्वरून कावड यात्रा मार्गक्रमण करणार त्या त्या ठिकाणी अल्पपोपहार,फळ, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. कावड यात्रेमध्ये रूग्णवाहीका देखील ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे.  कावड यात्रेमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

Related to this topic: