वीज समस्या

नवी डीपी बसवली; नगरसेवकांच्या तत्परतेमुळे वीज समस्या सुटली..

Electricity Problem: हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरळीत झाला. नागरिकांना आता वीज खंडित होण्याची समस्या नाही.

नवी डीपी बसवली; नगरसेवकांच्या तत्परतेमुळे वीज समस्या सुटली..

Electricity Problem

हिंगोली (Electricity Problem) : शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मारवाडी गल्ली येथे बालाजी मंदिराशेजारील विजेच्या डीपीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. दिवसभरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे घरातील पंखे, कुलर, फ्रिज यांसारखी उपकरणे बंद पडत होती. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत होता.

नागरिकांनी ही समस्या वारंवार नगरसेवक भरत चौधरी पहेलवान, नगरसेवक चंदू लव्हाळे आणि नगरसेवक पै. कपिल भैय्या खंडेलवाल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत तिघा नगरसेवकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

नगरसेवकांच्या पाठपुराव्यानंतर वीज विभागाने तातडीने पावले उचलत सोमवारी रात्रीच्या सुमारास जुनी व नादुरुस्त डीपी काढून त्याजागी नवीन डीपी बसवली. हे काम आज पूर्ण करण्यात आले. नवीन डीपी बसवल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा (Electricity Problem) आता सुरळीत झाला असून यापुढे वीज खंडित होण्याची समस्या उद्भवणार नाही, अशी माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नगरसेवकांच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भरत चौधरी पहेलवान, चंदू लव्हाळे आणि पै. कपिल  खंडेलवाल यांचे आभार मानले आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026