सेवा हक्क दिन

उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार

Seva Hakka Din: मानोरा तहसील कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा केला गेला. तहसीलदार व इतर कर्मचार्‍यांनी पारदर्शक सेवा प्रदान करण्याची प्रतिज्ञा केली

उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार

Seva Hakka Din

 

तहसील कार्यालय मानोरा येथे सेवा हक्क दिन उत्साहात साजरा

मानोरा (Seva Hakka Din) : तहसील कार्यालय मानोरा येथे २८ एप्रिल २०२६ रोजी सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा देण्याचा उद्देश या दिनानिमित्ताने अधोरेखित करण्यात आला. (Seva Hakka Din) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेंद्र पाटील होते, तर निवासी तहसीलदार बनसोड यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार अष्टुरे व निवडणूक नायब तहसीलदार मुकुंद यांचे स्वागत भेलके यांनी केले. प्रास्ताविकात मुकुंद  यांनी सेवा हक्क अधिनियम २०१५ बाबत सविस्तर माहिती दिली. तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयामार्फत निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत प्रमाणपत्र वितरित केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.  

तालुक्यातील जनतेला आपले सरकार सेवा केंद्रामार्फत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सेवा केंद्र संचालक प्रविण गावंडे यांचा तहसीलदारांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राजेंद्र भेलके, कुपटा येथील रविंद्र ठाकरे, मंडळ अधिकारी आर. एस. पवार, योगिता गडवे, ग्राम महसूल अधिकारी के. बी. राठोड, संजय मनवर, शाखा महसूल अधिकारी भोरकडे आणि पुरवठा शाखा महसूल अधिकारी कालापाड यांचाही उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व (Seva Hakka Din) आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि नागरिक यांना (Seva Hakka Din) सेवा केंद्र दिनाच्या अनुषंगाने शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत सौजन्य, निष्ठेने प्रामाणिकपणे व भ्रष्टाचार विरहित तत्परतेने सचोटीने विना विलंब विना अडथळा पात्र नागरिकांना सेवा देण्याची शपथ देण्यात आली. व तहसील कार्यालयात विविध बारकोड बॅनर लाऊन उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली. 

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र लवकर काढून घेण्याचे आवाहन केले. सेवा हक्क अधिनियमातील उद्देश, कर्तव्य आणि जबाबदारी याविषयीही त्यांनी माहिती दिली. या (Seva Hakka Din) कार्यक्रमामुळे तहसील कार्यालयातील सेवा गुणवत्ता वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले असून नागरिकांमध्येही शासकीय सेवांबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार मुकुंद यांनी केले. तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तहसिल कर्मचारी व आपले सरकार केंद्र चालक यांनी अथक परिश्रम घेतले. 

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026