, Poharadevi Bus Service

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

, Poharadevi Bus Service

गणेश चतुर्थीपासून मुक्काम बससेवा; भाविकांची प्रवासाची गैरसोय दूर होणार

मानोरा : गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुलढाणा ते काशी पोहरादेवी अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. गणेश महाराज पोहरादेवी यांच्या पाठपुराव्याने, आगार व्यवस्थापक कल्पना शिरसाठ व विभागीय सचिव शंकर जाधव यांच्या सहकार्याने ही एसटी बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे बुलढाणा परिसरातील भाविकांना काशी पोहरादेवी येथे ये-जा करणे सोयीचे झाले आहे.

देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या काशी पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमा, रामनवमी, दसरा, घटस्थापना आदी सण-उत्सवांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळी भाविकांना प्रवासासह विविध गैरसोयींचा सामना करावा लागतो. नंगारा भवन ही कल्पक व ऐतिहासिक वास्तू केंद्रस्थानी आल्यानंतर काशी पोहरादेवी येथे भाविकांसह पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून काशी पोहरादेवीसाठी एसटी बससेवा सुरू करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

मागील पंधरा वर्षांपासून कर्नाटक राज्यातील चिंचोली–पोहरादेवी, तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई–पोहरादेवी बससेवा सुरू आहे. मुंबई-कल्याण–पोहरादेवी ही बस मागील वर्षभरापासून वाशिमपर्यंत धावत असल्याने पुढील प्रवासासाठी भाविकांची गैरसोय होत आहे. पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर, रत्नागिरी, अमरावती आदी ठिकाणांहूनही एसटी बससेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

याडी मरीयामा, संत सेवालाल महाराज, याडी सामकी माता तसेच महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या बंजारा समाजाच्या काशी तीर्थक्षेत्राला ये-जा करण्यासाठी बुलढाणा ते पोहरादेवी ही मुक्काम बससेवा गणेश चतुर्थीच्या दिवशी, २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.

ही बस बुलढाणा येथून वरवंड, डोंगरखंडाळा, करवंड, उदयनगर, चिंचपूर, लाखनवाडा, आंबेटाकळी, पळशी, बाळापूर, वाडेगाव, पातूर, मेडशी, मालेगाव, वाशिम, धानोरा मार्गे पोहरादेवी येथे नियमित मुक्कामी राहणार आहे.

पोहरादेवीत एसटी डेपोची मागणी

पोहरादेवी येथे एसटी बस डेपोची निर्मिती करून बसस्थानकावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नागपूर–नांदेड धावणाऱ्या एसटी बसेस पोहरादेवी मार्गे वळवून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांतूनही येथे बससेवा सुरू करणे गरजेचे आहे.

नंगारा भवन ही वास्तू पर्यटकांना तसेच बंजारा समाजाच्या रूढी-परंपरांचे दर्शन घडविणारे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. ही वास्तू पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने येथे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी व्यक्त केली.

संबंधित सामग्री

अखेर स्टेट बँक मानोरा शाखेला कायमस्वरूपी क्षेत्रीय अधिकारी रूजू!

अखेर स्टेट बँक मानोरा शाखेला कायमस्वरूपी क्षेत्रीय अधिकारी रूजू!

State Bank Manora: भारतीय स्टेट बँक शाखा मानोरा ही तालुक्यातील सर्वात मोठी बँक शाखा असून, या शाखेला गेल्या अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी क्षेत्र अधिकारी नव्हता. त्यामुळे ९०  गावांतील शेतकरी..

Nov 17, 2026
हिंगोलीच्या गजानन शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन

हिंगोलीच्या गजानन शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन

Maharashtra Granthmitra Award: ग्रंथालय क्षेत्रातील चळवळीत स्वतःला वाहून घेणारे हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष श्री गजानन शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर..

Nov 17, 2026
'कर्जवसुली करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही' - सुप्रीम कोर्ट

'कर्जवसुली करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही' - सुप्रीम कोर्ट

कर्जवसुली करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना दिलासा! केवळ एनपीए किंवा वसुलीच्या कारवाईवरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही.

Nov 17, 2026
रोहित पवारांचा भाजप नेत्यांना सूचक इशारा; म्हणाले, योग्य वेळी उत्तर देणार!

रोहित पवारांचा भाजप नेत्यांना सूचक इशारा; म्हणाले, योग्य वेळी उत्तर देणार!

रोहित पवारांचा भाजप नेत्यांना सूचक इशारा! अजितदादांशी आणि महाराष्ट्राच्या जनतेशी बांधिलकी असल्याचे सांगत योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.

Nov 17, 2026
फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय!

फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय!

फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय! पालघरमध्ये जिल्हा न्यायालय, नक्षलवाद्यांकडून लुटलेल्या शस्त्रांसाठी रोख बक्षीस योजना.

Nov 17, 2026