जिल्हा परिषद शाळा

लिंबाळा मक्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निलंबीत

Zilla Parishad School: हिंगोलीतील लिंबाळा मक्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक विनोद कटके यांचा निलंबन आदेश मुख्यकाऱ्याधिकारी विवेक गायकवाड यांनी सादर

लिंबाळा मक्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निलंबीत

Zilla Parishad School

 

जि प सीईओंनी काढले आदेश

हिंगोली (Zilla Parishad School) : हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांना निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सोमवारी  १७ ऑगस्टला काढले आहेत.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कटके हे मद्यपान करून शाळेत येतात, विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत तसेच गावातील व्यक्तींना विनापरवानगी शाळेत शिकविण्यास सांगतात तसेच दुपारी तीन वाजल्यानंतर शाळा भरवत नाहीत तर शाळेत विद्यार्थी गेल्यास त्यांना हाकलून लावत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी  ४ फेब्रुवारी २०२६ रोजी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांना एप्रील महिन्यात नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. या सोबतच हिंगोली पंचायत समिती कार्यालयास तातडीने शाळेला भेट देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकारानंतर पुढे शिक्षण विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला होता.

दरम्यान, काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी (Zilla Parishad School) शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी गावकरी व विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला होता. यावरून दिपके यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली होती.

यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याध्यापक कटके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. यावरून मुख्याध्यापक कटके यांना निंलबीत करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

वारंगा जि. प. शाळेतील साहित्य फोडल्याने गुन्हा दाखल

वारंगा जि. प. शाळेतील साहित्य फोडल्याने गुन्हा दाखल

Warangaphata Zilla Parishad School: कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वारंगाफाटा शाळेतील ३५ हजार रुपये कीमतीचे साहित्य फोडून नासधूस करण्यात आली याबाबत अज्ञात इसमा विरूद्ध...

Sep 30, 2026
चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखलीत आयटीआय व जिल्हा परिषद शाळेचा रस्ता चार दिवस बंद; मनसेच्या मागणीनंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. जागेच्या मालकीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

Sep 21, 2026
चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकाऱ्यांना बांधली राखी; संग्राम जाधव यांनी दिले संरक्षणाचे अभिवचन

चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकाऱ्यांना बांधली राखी; संग्राम जाधव यांनी दिले संरक्षणाचे अभिवचन

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला.

Aug 28, 2026
उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

Aug 28, 2026
आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत सामाजिक उपक्रम

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत सामाजिक उपक्रम

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Aug 22, 2026