ITI Chikhli

चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखलीत आयटीआय व जिल्हा परिषद शाळेचा रस्ता चार दिवस बंद; मनसेच्या मागणीनंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. जागेच्या मालकीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

शंभर वर्षांचा रस्ता रोखल्याचा आरोप; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर प्रमुखांचा जागेवर मालकीचा दावा

चिखली : स्थानिक आयटीआय (ITI) आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेल्या चार दिवसांपासून एक चारचाकी गाडी आडवी लावून रस्ता बंद करण्यात आल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत रस्ता त्वरित मोकळा करण्याची मागणी पोलीस व आयटीआय प्रशासनाकडे केली. वाढत्या वादानंतर पोलिसांनी अखेर ती गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हलवली असून, आता हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.

गेल्या चार दिवसांपासून गेटवरच गाडी उभी असल्याने आयटीआयचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तासन् तास रस्त्यावर ताटकळत उभे होते. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर वर्गात पोहोचता आले नाही. या गंभीर प्रकारावर मनसेचे जिल्हाप्रमुख गणेश उर्फ बंडू बरबडे, राजेश परिहार, खरपास आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

“शासनाने या ठिकाणी लाखो-करोडो रुपये खर्चून आयटीआयची इमारत उभारली आहे, तर जिल्हा परिषदेची शाळा येथे गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून याच रस्त्याचा वापर करत आहेत. मग अचानक रस्त्याचा आणि जागेचा वाद आताच कसा समोर आला? प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता कायमचा मोकळा करून द्यावा,” अशी ठाम भूमिका मनसे जिल्हाप्रमुख गणेश बरबडे यांनी मांडली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) शहर प्रमुख शरद भाला यांनी संबंधित जागेवर स्वतःचा मालकी हक्क सांगत दावा केला आहे. “ज्या ठिकाणी गाडी उभी होती, ती माझी मालकीची जागा (प्लॉट) आहे. माझी ही बाजू मी पोलीस प्रशासनासमोर अधिकृतपणे मांडणार आहे,” असे भाला यांनी स्पष्ट केले.

आयटीआय प्राचार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गेल्या चार दिवसांपासून प्रवेशद्वारावर गाडी लावून रस्ता अडवला गेला असताना आयटीआयच्या प्राचार्यांनी यासंदर्भात पोलीस प्रशासनाला तात्काळ लेखी तक्रार का दिली नाही? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे. प्राचार्यांच्या या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

मनसे पदाधिकारी आणि आयटीआयच्या प्राचार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गाडी हटवण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गाडी पोलीस ठाण्यात जमा केली आहे. हा संपूर्ण विषय कायदेशीर बाबींशी जोडला गेला असला, तरी अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता अचानक बंद झाल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता या वादावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026