Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Social Initiative

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत सामाजिक उपक्रम

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत सामाजिक उपक्रम

Social Initiative |

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप

कोरची : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त कोरची ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले, तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय नोटबुकचे वितरण करण्यात आले.

कोरची ग्रामीण रुग्णालयात आयोजित फळवाटप कार्यक्रमात रुग्णांना फळे देण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करण्यात आली. आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे रुग्णांनी स्वागत केले. तसेच आमदार मसराम यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत सदिच्छा व्यक्त केल्या.

दरम्यान, कोरची येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय नोटबुकचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची तालुक्यासह आरमोरी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, वसीम शेख, रवी नंदेश्वर, गोपाल मोहुर्ले, खेदुराम साहू, जितेंद्र सांडील, हमीद पठाण, दुखूराम सांगसूरवार, अरुण मोहुर्ले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड मिळाली. रुग्ण आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

Related to this topic: