इंधनटंचाईने शेतकरी संकटात

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा

Fuel Shortage Trouble: खरीप हंगामातील शेतकामासाठी डिझेल-पेट्रोलचा अभाव कारणीभूत झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बंदपडले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा

Fuel Shortage Trouble

देऊळगाव राजा (Fuel Shortage Trouble) : खरीप हंगाम तोंडावर असताना तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल-पेट्रोल टंचाईमुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर व्यावसायिक अडचणीत सापडले असून, शेती मशागतीसाठी आवश्यक इंधन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे बैल नसल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, पेरणी, फवारणी व इतर शेतीकामे केली जातात. मात्र तालुक्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ट्रॅक्टर बंद पडले आहेत. काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसून, ज्या ठिकाणी डिझेल मिळत आहे तेथेही मर्यादित प्रमाणातच पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

इंधनअभावी शेतीची महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढलेले उत्पादन खर्च आणि महागाईमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना इंधनटंचाईने त्याच्या समस्यांमध्ये अधिक भर पडली आहे. तसेच मोटारसायकलद्वारे व्यवसाय करणारे व सामान्य नागरिकांनाही पेट्रोलअभावी दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शेतकरी (Fuel Shortage Trouble) व नागरिकांना आवश्यक प्रमाणात डिझेल-पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठा जनआक्रोश निर्माण होऊन आक्रमक आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, माजी पंचायत समिती सभापती सुधाकर म्हस्के, गणेश बुरकूल, गणेश सवडे, शिवाजी कोल्हे, काकासाहेब म्हस्के, शेख कदीर, शेषराव कोल्हे, माजी सभापती महेश देशमुख, बबनराव डोके, शहराध्यक्ष विष्णू रामाने, सुनिल म्हस्के, अशोक शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी सुधारित निकष; पर्जन्यमानासोबत पीकनुकसान, मृदा आर्द्रता, भूजल पातळी व इतर घटकांचा विचार होणार.

Sep 22, 2026
ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात यंदा ६८.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा; गतवर्षी ९९.०१ टक्के होता. कमी पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Sep 21, 2026