वीज पुरवठा खंडीत

हिंगोलीत थकबाकीमुळे खंडीत विज पुरवठ्याची अनाधिकृतपणे जोडणी

Electric Power Supply: मीटरला येणार्‍या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या वीज जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर केल्याने शहरातील सहा वीज ग्राहकावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

हिंगोलीत थकबाकीमुळे खंडीत विज पुरवठ्याची अनाधिकृतपणे जोडणी

Electric Power Supply

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली (Electric Power Supply) : शहरामध्ये काही वीज ग्राहकाकडे महावितरणची थकबाकी असल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. परंतु त्यांनी मीटरला येणार्‍या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या वीज जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर केल्याने शहरातील सहा वीज ग्राहकावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील जैन गल्ली व दत्त नगर भागात सहाय्यक अभियंता सचिन बेरसले यांच्यासह पथकाने १३ मार्च रोजी अनेक विद्युत मीटरची पाहणी केली. ज्यामध्ये काही ग्राहकाकडे थकबाकी रक्कम असल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. परंतु त्यांनी मीटरला येणार्‍या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर केल्याचे तपासणी दरम्यान निदर्शनास आले. ज्यामध्ये जैन गल्लीतील अब्दुल करीम शेख हसन, बलराम भुमन्ना येल्लारे रा. जैन गल्ली हिंगोली, शेख इब्राहीम शेख सयाजी रा. दत्त नगर हिंगोली यांनी २९५ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. 

महावितरण कंपनीचे ४४९० रुपयाचे आर्थिक नुकसान केले व या वीज ग्राहकाकडे महावितरणचे पुर्वीच थकीत वीजबील रक्कम २० हजार ८७० इतके बाकी असुन त्याचा भरणा करण्यात आला नाही. त्याच प्रमाणे हिंगोलीतील भोईपुरा व पेन्शनपुरा भागातही या पथकाने वीज मीटरची पाहणी केली. ज्यामध्ये भोईपुरा भागातील देऊजी मानकोजी आडणे रा. भोईपुरा हिंगोली याने स्मार्ट मीटरवरील वीज पुरवठा महावितरण कंपनीच्या संगणक प्रणालीव्दारे थकबाकीमुळे पुर्वीच बंद केला होता.

परंतु त्याने मीटरला येणार्‍या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या (Electric Power Supply) वीज जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर सुरू केल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले. तसेच पेन्शनपुरा भागातील चंद्रकांत नामदेव गाडे, शेख जहीर शेख कदीर या दोघांकडे महावितरणची वैध जोडणी नसून नजीकच्या लघुदाब वीज वाहीनीवर आकोडा टाकुन अनाधिकृतरित्या वीजेचा वापर केला. या तिन्ही आरोपींनी ४८१ युनिटची वीज चोरी केली. महावितरण कंपनीचे ९९२० रुपयाचे आर्थिक नुकसान केले.

तसेच या ग्राहकाकडे महावितरण कंपनीची पुर्वीची थकीत वीज बील (Electric Power Supply) रक्कम २४८३० रुपये इतके बाकी असुन त्याचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे १९ मार्चला हिंगोली शहर पोलिसात सहाय्यक अभियंता सचिन बेरसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊजी मानकोजी आडणे रा. भोईपुरा,  चंद्रकांत नामदेव गाडे, शेख जहीर शेख कदीर रा. पेन्शनपुरा हिंगोली  या तिघावर भारतीय विद्युत कायदा सन २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास आर.एस. कोरडे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026