हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली जिल्हा परिषदेत ५४ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

Hingoli Zilla Parishad: हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात झालेल्या लगभग ५४ लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल. आरोपीने बनावट स्वाक्षऱ्या करून धनादेश तयार केले.

हिंगोली जिल्हा परिषदेत ५४ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

Hingoli Zilla Parishad

अपहार केलेल्या रकमेपैकी 29 लाख 99 हजार 755 रुपये आरोपीने कार्यालया कडे धनादेशाद्वारे केले जमा 

हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे 53 लाख 95 हजार रुपयांचा मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 28 एप्रिल 2026 रोजी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला. (Hingoli Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम बाबुराव खुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. 

फिर्यादीनुसार पशुसंवर्धन विभागात कनिष्ठ साहाय्यक (लेखा) या पदावर कार्यरत असलेल्या व सध्या निलंबित असलेल्या श्रीमती सोनल चंद्रकांत जावळे यांनी 1 ऑक्टोबर 2015 ते 11 जून 2025 या कालावधीत हा अपहार केला. आरोपीने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून वेगवेगळे धनादेश तयार केले. सेवाशुल्काच्या 39 लाख 80 हजार 943 रुपये, वेतन व भत्ते कपातीचे 12 लाख 3 हजार 709 रुपये तसेच पुरवठादारांच्या जीएसटी व टीडीएसचे 2 लाख 11 हजार 46 रुपये असे एकूण 53 लाख 95 हजार 698 रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंगोली शाखेतील खाते क्रमांक 0062069635805 मध्ये वर्ग करून त्यांचा अपहार केला. 

दरम्यान अपहार केलेल्या रकमेपैकी 29 लाख 99 हजार 755 रुपये आरोपीने कार्यालयाकडे धनादेशाद्वारे जमा केले आहेत. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या (Hingoli Zilla Parishad) प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत असून  आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या या अपहारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026