हिंगोली तापमान

हिंगोलीचा पारा ४० अंशांच्या पार; दूपारचा शुकशूकाट

Hingoli Temperature: हिंगोलीत चालू तापमानाच्या उच्चांकामुळे दैनंदिन जीवन स्थगित झालेले आहे. रस्ते सूनसान, पाण्याची मागणी वाढली.

हिंगोलीचा पारा ४० अंशांच्या पार; दूपारचा शुकशूकाट

Hingoli Temperature

हिंगोली (Hingoli Temperature) : संपूर्ण राज्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वर सरकला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, नेहमी गजबजलेल्या असणार्‍या 'पोलीस वसाहती'मधील रस्त्यांवर आता भर दुपारी शुकशुकाट पहायला मिळत आहे. उन्हाच्या झळांनी हिंगोलीकर हैराण झाले आहेत. मार्च महिना संपता संपता हिंगोलीत सूर्य आग ओकू लागला आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच (Hingoli Temperature) उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागतात, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. पोलीस वसाहत, जी नेहमी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या येज्ञजा करण्याने गजबजलेली असते, तिथे आता दुपारच्या वेळी सामसूम असते. अत्यावश्यक काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र आहे.

रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे वसाहतीमधील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गांवर वाहनांची ये-जा पूर्णपणे मंदावली आहे. दुपारच्या वेळी उष्ण वारे वाहत असल्याने नागरिक घरांमध्येच राहणे पसंत करत आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेत पालकांनी त्यांना बाहेर पडण्यापासून रोखले आहे.

पाण्याची मागणी वाढली असल्याचे दिसत आहे. एकीकडे (Hingoli Temperature) उष्णता वाढत असताना दुसरीकडे थंड पेये आणि पाण्याचे महत्त्व वाढले आहे. वसाहतीमध्ये ठिकठिकाणी नागरिक सावलीचा आधार शोधताना दिसत आहेत. प्रशासनाकडूनही नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि उन्हापासून संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येणार्‍या दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026