परभणी हिंदू संमेलन

परभणीत उद्या हिंदू संमेलनाचे आयोजन...!

Parbhani Hindu Sammelan: २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता सदगुरु नगर मैदान येथे हिंदू समाजामध्ये सामाजिक समरसता व राष्ट्रीय बांधिलकी दृढ करण्याच्या उद्देशाने हिंदू संमेलनाचे आयोजन केले जाईल.

परभणीत उद्या हिंदू संमेलनाचे आयोजन...!

Parbhani Hindu Sammelan

सदगुरु नगर मैदान येथे सायंकाळी ६ वाजता विहिंपचे अनंत पांडे यांचे व्याख्यान

परभणी (Parbhani Hindu Sammelan) : हिंदू समाजामध्ये सामाजिक समरसता, सांस्कृतिक जागरुकता आणि राष्ट्रीय बांधिलकी दृढ करण्याच्या उद्देशाने भव्य व्यापक हिंदू संमेलन २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वा सदगुरु नगर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संजय कुलकर्णी, रामा रेंगे, अंबादास वाकोडे यांची उपस्थिती होती.

या (Parbhani Hindu Sammelan) संमेलनामध्ये संघटित हिंदू - समर्थ राष्ट्र'या विषयावर वक्ते क्षेत्र सहमंत्री विश्व हिंदू परिषद अनंत लक्ष्मीकांत पांडे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्ष यशवाडी देवस्थान १००८ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज तसेच माणिक भगवानराव रेंगे महाराज जांब हे आशीर्वचन करणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन, समाज जागृतीपर विचार आणि हिंदु समाजाचे संघटन याबाबत मार्गदर्शन होणार आहे.

हिंदू समाजातील युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक वैभव नगर, नवजीवन कॉलनी, आर्यवृत नगर, प्रभावती नगर, सहकार नगर, सुजाता कॉलनी, जिजाऊ नगर, ऑडीट नगर, रायगड नगर, शिवनेरी नगर, बालाजी नगर, मोगरा कॉलनी, बापू नगर, विवेकानंद नगर, पोस्ट कॉलनी, चिद्रवार नगर, सदगुरु नगर, राम नगर, साई नगर, गंगापुत्र कॉलनी, नेहरु नगर, भारत नगर, शाहु नगर, संत तुकाराम नगर, योगक्षेम नगर समस्त हिंदू समाज यांनी केले आहे. कार्यक्रमाची सांगता प्रसादाने होणार आहे.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026