डिझेल उपलब्ध करून शेतीची कामे मार्गी लावा; अन्यथा रास्ता रोको — संतोष भुतेकर व सचिन कदम यांचा इशारा

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल इंधन टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा मोठा फटका शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना बसत आहे.

डिझेल उपलब्ध करून शेतीची कामे मार्गी लावा; अन्यथा रास्ता रोको — संतोष भुतेकर व सचिन कदम यांचा इशारा

Diesel Shortage

चिखली (Diesel Shortage) : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल इंधन टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा मोठा फटका शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना बसत आहे. विशेषतः चिखली व देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अन्यथा येत्या २५ मे रोजी चिखली-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर व मंडपगावचे सरपंच सचिनभाई कदम यांनी दिला आहे.

सध्या पावसाळा व खरीप पेरणीचे दिवस जवळ आले असून शेतातील नांगरणी, वखरणी व पेरणीची कामे वेगाने सुरू होणे आवश्यक आहे. मात्र डिझेलअभावी अनेक ट्रॅक्टर जागेवरच उभे राहत असून हजारो हेक्टर शेती मशागतीविना पडून राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक पेट्रोल पंप चालक प्रशासनाच्या आदेशाचे कारण देत ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार देत आहेत. परिणामी ट्रॅक्टर घेऊनच पंपावर जावे लागत असून तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे.

ज्या पेट्रोल पंप चालकांनी शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल भरून दिले, त्यांच्यावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रशासनाची ही भूमिका शेतकरीविरोधी असून तातडीने त्यात बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व पेट्रोल पंपांना ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल देण्याचे निर्देश द्यावेत व शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी अंडेरा पोलीस स्टेशन हद्दीत चिखली-जालना महामार्गावर असंख्य ट्रॅक्टरसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संतोष पाटील भुतेकर व सचिनभाई कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026