हिंगोली पोलिस वसाहत घरफोडी

हिंगोलीतील पोलिस वसाहतीची  सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी

Hingoli Police Colony Burglary: पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चोर्‍यांचे सत्र सुरुच ठेवले आहे. शहरातील  नवीन पोलिस वसाहतीमधील पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी २ लाख ९४ हजार रुपयाचा ऐवज

हिंगोलीतील पोलिस वसाहतीची  सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी

Hingoli Police Colony Burglary

हिंगोली (Hingoli Police Colony Burglary) : पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चोर्‍यांचे सत्र सुरुच ठेवले आहे. शहरातील  नवीन पोलिस वसाहतीमधील पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी २ लाख ९४ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले आहे.

हिंगोली शहरातील खटकाळी  रस्त्यावर नवीन पोलिस वसाहत असून अनेक पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी या  ठिकाणी  निवासस्थाने उपलब्ध  करून दिले  आहेत. पोलिस वसाहतीच्या सी-विंग मध्ये पोलिस उपनिरीक्षक  शाम खुळे यांचे निवासस्थान आहे. १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या  घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याने पोलिस उपनिरीक्षक शाम खुळे यांनी निवासस्थानाला कुलूप लावून कर्तव्यावर गेले  होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या  घराला कुलूप असल्याचे पाहून कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी खुळे यांच्या  घरातील साहित्याची उचका  उचक करून लोखंडी  कपाटाचा कुलूप तोडून त्यातील नगदी १ लाख ५ हजार ७४० रुपये व १ लाख ८९ हजार रुपयाचे सोन्या -चांदीचे  दागिने असा एकूण २ लाख ९४ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. खुळे  हे कर्तव्यावरून परत आल्यानंतर त्यांच्या  घराचे कुलूप तुटलेल्या  अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी हिंगोली  शहर पोलिसांना या बाबतची माहिती दिली.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक  देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  दिपक मस्के, पोलिस उपनिरीक्षक गजानन गिरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  संजय मार्वेâ, जमादार अशोक धामणे, एम.एम. शेख  यांच्या पथकाने घटनास्थळी  भेट देवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहणी केली. यामध्ये एका ठिकाणाी  दोन ते तीन चोरटे तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. या प्रकरणात पोलिस उपनिरिक्षक शाम खुळे यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून अज्ञात दोन चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन गिरी हे करीत आहेत.

 हिंगोली शहरामध्ये चोर्‍यांचे सत्र सुरुच आहे. एकीकडे चोर्‍या होत असताना त्याचा उलगडा करण्यात पोलिस यंत्रणा कमकुवत ठरत आहे. हिंगोली  शहरामध्ये वाहन चोरीच्या  घटनाही  अनेक घडल्या  आहेत. चोरट्यांनी पोलिसांना  आवाहन दिले आहे. सध्या  सणासुदीचे  दिवस सुरु असताना चक्क पोलिस वसाहतीमधील लाईन ईंचार्ज शाम खुळे  यांचे घर  फोडून २ लाख९४ हजार रुपयाची घरफोडी केल्याने पोलिस वसाहतीमधील सुरक्षा  धोक्यात आली आहे.

संबंधित सामग्री

वाघोलीत घरफोडी; रात्री घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास

वाघोलीत घरफोडी; रात्री घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास

Wagholi Burglary case: वाघोली येथे अज्ञात चोरट्याने घराच्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपया..

Oct 01, 2026
पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026
चिखलीतील शाहूनगरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी

चिखलीतील शाहूनगरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी

Chikhali-Shahunagar Burglary: शहरातील शाहूनगर तसेच पंचमुखी महादेव मंदिर परिसरात अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ, एकापाठोपाठ एक अशा तब्बल सहा ठिकाणी घरफोडी

Sep 15, 2026
परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.

Aug 28, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले

पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले

वसमत येथील पंचशील नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला चोरांची भीती दाखवून व पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याची घटना शुक्रवारी घडली.

Aug 22, 2026