पातूर घरफोडी प्रकरण

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case

 

लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा डल्ला

पातूर (Patur burglary case) : शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पातूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख समीर अब्दुल अजीज (४०) रा. सैदू प्लॉट, मुजावरपुरा, पातूर हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. २६ सप्टेंबर रोजी सकाळी घरी परतल्यानंतर समीर शेख यांना घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले तसेच लाकडी दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील बेडरूमच्या दरवाजाचेही कुलूप तोडण्यात आले होते.

घराची पाहणी केली असता कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड तसेच पत्नीचे अंदाजे पाच ते सहा तोळे चांदीचे दागिने (किंमत सुमार १५ हजार रुपये), असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३३१ (४), ३०५ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल अधिकारी GPSI खंडारे असून तपास ASI दत्तात्रय चव्हाण करीत आहेत.

टैग्स: Patur burglary case