Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Retired Teacher

पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले

वसमत येथील पंचशील नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला चोरांची भीती दाखवून व पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याची घटना शुक्रवारी घडली.


पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले

Retired Teacher |

सोन्याची अंगठी काढून घेतली; पुडीत खडा बांधून दिला

वसमत : येथील पंचशील नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला चोरांची भीती दाखवून व पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याची घटना शुक्रवारी घडली. शिक्षकाच्या हातातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेऊन पुडीत खडा बांधून देत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून घराकडे निघालेले गुंडीबा नागोराव थोरात, रा. पंचशील नगर, वसमत, हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. २१ ऑगस्ट, शुक्रवारी सायंकाळी दोन अज्ञात इसमांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगून चोरांची भीती दाखवली. समोर चोरटे आहेत, पोलीस तपासणी करत आहेत, त्यामुळे खबरदारी म्हणून हातातील अंगठी काढून खिशात ठेवा, असा सल्ला त्यांना देण्यात आला.

घर जवळ असल्याने थोरात यांनी अंगठी काढून त्या इसमाजवळ दिली. त्यातील एकाने सदर अंगठी कागदात बांधून पुन्हा थोरात यांच्याकडे दिली. ती पुडी खिशात ठेवून ते घरी गेले. घरी पुडी उघडून पाहिली असता त्यात अंगठीऐवजी खडा निघाला. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात जाऊन दोन अज्ञात इसमांविरोधात तक्रार दिली आहे.

दिवसाढवळ्या पोलीस असल्याची बतावणी करून सहा ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतल्याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले करत आहेत. संशयित चोरट्यांचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच चोरटे सापडतील, असा विश्वास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी ‘देशोन्नती’शी बोलताना व्यक्त केला.

वसमत शहरात यापूर्वीही घटना घडल्या

वसमत शहरात यापूर्वीही पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने काढून घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी बहिर्जी नगर भागात एका सेवानिवृत्त शिक्षकाचे दागिने काढून घेऊन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा एका सेवानिवृत्त शिक्षकाला पोलीस असल्याची बतावणी करून फसवण्यात आल्याचे समोर आले आहे.

वसमतमध्ये सामान्य नागरिकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका महिलेला भुरळ घालून तिच्या अंगावरील दागिने काढून घेण्याची घटनाही घडली होती. या प्रकरणाचा शोध पोलिसांनी तातडीने लावून चोरट्यांना ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे या घटनेचाही शोध लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Related to this topic: