Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा

House Breaking Case

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.


परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद १० हजारांचा मोबाईल जप्त

House Breaking Case |

साखला प्लॉट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेले आरोपी ताब्यात

परभणी : घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले. कालासिग गुरुबच्चनसिग दुधानी (वय २०) आणि राहुलसिग धारासिग दुधानी (वय १९), दोघेही रा. साखला प्लॉट, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईदरम्यान आरोपींकडून १० हजार रुपये किमतीचा कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडीच्या तसेच विविध गुन्ह्यांतील पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेत शहरात गस्त घालत होते. त्यावेळी साखला प्लॉट परिसरात ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या घरासमोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी साखला प्लॉट परिसरात सापळा रचला. त्यानंतर कालासिग गुरुबच्चनसिग दुधानी आणि राहुलसिग धारासिग दुधानी यांना त्यांच्या घरासमोरून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालासिग गुरुबच्चनसिग दुधानी हा गंगाखेड पोलीस ठाण्यातील २०२४ मधील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे. तर राहुलसिग धारासिग दुधानी हा परभणी ग्रामीण पोलीस, जिंतूर आणि नानलपेठ पोलीस ठाण्यांतील २०२६ मधील विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची घटना २०२६ मध्ये घडली असून, संबंधित फिर्यादीच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश भुजबळ, पोह. केशव लटपटे, पोह. नेताजी गित्ते, पोह. कांगणे आणि पोह. महेश पांगरकर यांच्या पथकाने केली.

Related to this topic: