बंजारा विरासत संघ

बंजारा विरासत संघाचा संवाद मेळावा उत्साहात

Banjara Heritage Sangh: बंजारा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक प्रगती अधिक गतिमान करण्यासाठी बंजारा विरासत संघाच्यावतीने नुकतेच युवकांनी संवाद मेळाव्याचे आयोजन

बंजारा विरासत संघाचा संवाद मेळावा उत्साहात

Banjara Heritage Sangh

 

मेळाव्यात संघटन विस्तार आणि सदस्य नोंदणीवर भर

मानोरा (Banjara Heritage Sangh) : बंजारा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक प्रगती अधिक गतिमान करण्यासाठी बंजारा विरासत संघाच्यावतीने नुकतेच युवकांनी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सदस्यता नोंदणी, संघटन विस्तार आणि आगामी काळातील आव्हाने या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.   
मेळाव्यात उपस्थित प्रसारकांसमोर (Banjara Heritage Sangh) बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी मांडलेल्या विचारांमध्ये सर्व समाज बांधवांनी आपले योगदान द्यावे, तसेच सदस्य नोंदणी सोबतच प्रत्येक सदस्याचा सक्रिय सहभाग आणि मजबूत संघटनात्मक नेटवर्क निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच समाजाला पुढे नेता येईल. असे मत याप्रसंगी बंजारा विरासत संघाचे मुख्य संयोजक तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपले विचार मांडताना संवाद मेळाव्यात व्यक्त केले. व युवकासोबत संवाद साधला. 

 यावेळी महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत रायसिंग महाराज, शिवसेना शिंदे पक्षाचे युवा पदाधिकारी पराग पिंगळे, विशेष कार्य अधिकारी मोहन राठोड तसेच मोठ्या संख्येने बंजारा विरासत संघाचे प्रसारक उपस्थित होते. पुढे आपले विचार मांडताना ना. राठोड म्हणाले की, बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारसाचे जतन, संवर्धन आणि समाज बांधवांना एका व्यासपीठावर आणण्याचा बंजारा विरासत संघाचा उद्देश आहे.

समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती इतिहास आणि सामाजिक एकजूट अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी (Banjara Heritage Sangh) बंजारा विरासत संघाची स्थापना करण्यात आली आहे. मेळाव्याच्या शेवटी "आपली विरासत, आपली ओळख, आपली एकजूट, संघटित समाजातून प्रगतीकडे  हा संघटनेचा संदेश सर्वांनी एकमुखाने दिला.  बंजारा विरासत संघाच्या या उपक्रमामुळे राज्यभरातील प्रसारकांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात सदस्य नोंदणी मोहीम अधिक जोमाने प्रसारकांनी राबवावी असे आवाहन धर्मगुरु जितेंद्र यांनी उपस्थित युवा समाजबांधवांना केले.

संबंधित सामग्री

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
एसटी आरक्षणाच्या मागणीच्या उपोषणाची तूर्तास सांगता; न्या. टहलियानी अभ्यास समितीला मुदतवाढ!

एसटी आरक्षणाच्या मागणीच्या उपोषणाची तूर्तास सांगता; न्या. टहलियानी अभ्यास समितीला मुदतवाढ!

पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण तूर्तास स्थगित; न्या. टहलियानी अभ्यास समितीला अहवालासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ.

Sep 21, 2026
ना. संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

ना. संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जिंतूर व पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या आमरण उपोषणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

Sep 18, 2026
बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी पोहरादेवी येथे बेमुदत उपोषण!

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी पोहरादेवी येथे बेमुदत उपोषण!

पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; समितीचा प्रगती अहवाल जाहीर करण्यासह विविध मागण्या.

Sep 15, 2026
पोहरादेवीत बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू

पोहरादेवीत बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू

पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आंदोलनकर्त्यांचे सामूहिक आमरण उपोषण सुरू झाले असून, सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 14, 2026