अकोला – श्रीक्षेत्र तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्पेशल स्वरूपात धावणारी ओखा–मदुराई रेल्वे आता ‘ओखा–तिरुपती’ या नावाने कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. तब्बल १५ वर्षांनंतर या मार्गावर नव्या नियमित गाडीची भर पडल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पश्चिम विदर्भातून तिरुपतीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, आतापर्यंत अमरावती–तिरुपती सुपरफास्ट हीच एकमेव नियमित गाडी उपलब्ध होती. इतर गाड्यांना केवळ तात्पुरत्या मुदतवाढीवर चालवले जात होते. मात्र, ओखा–तिरुपती गाडी नियमित झाल्याने प्रवाशांना कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध झाला आहे.
अकोल्यातील वेळापत्रक:
या गाडीचे अकोला स्थानकावर आगमन व प्रस्थान वेळाही निश्चित करण्यात आले आहेत.
- 19559 (तिरुपती–ओखा) गाडी सकाळी 11:40 वाजता अकोल्यात येते आणि 11:45 वाजता पुढे रवाना होते.
- 19560 (ओखा–तिरुपती) गाडी रात्री 9:40 वाजता अकोल्यात येते आणि 9:45 वाजता पुढील प्रवास सुरू करते.
प्रमुख थांबे:
ओखा, द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, भरूच, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, नांदेड, निजामाबाद, काचेगुडा, महबूबनगर, कर्नूल सिटी, धोन, कडप्पा, रेणिगुंटा आणि तिरुपती हे या गाडीचे महत्त्वाचे थांबे आहेत.
ही गाडी साप्ताहिक असून ओखाहून सोमवार आणि तिरुपतीहून गुरुवारी सुटते.
दरम्यान, अकोला स्थानकावरून तिरुपतीसाठी सध्या अमरावती–तिरुपती सुपरफास्ट (सोमवार, गुरुवार), अकोला–तिरुपती स्पेशल (रविवार – मार्चपर्यंत) आणि जयपूर–कोयंबत्तूर स्पेशल (सोमवार – मार्चपर्यंत) अशा गाड्याही उपलब्ध आहेत.
या नव्या नियमित सेवेच्या माध्यमातून भाविकांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होणार असून पश्चिम व दक्षिण भारतातील प्रवास अधिक सोयीस्कर होण