Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

दर्यापूर युवक हत्या

दर्यापूर शहरात किरकोळ वादातून भर दिवसा युवकाची हत्या

Daryapur youth murder: दर्यापूरमध्ये एक युवकाची किरकोळ वादातून भर दिवसा हत्या झाली. आरोपींनी चाकूने वार करून हत्या केली. शहरात भीतीचे वातावरण निर्माण


दर्यापूर शहरात किरकोळ वादातून भर दिवसा युवकाची हत्या

Daryapur youth murder |

 

शहरात भीतीचे वातावरण

दर्यापूर (Daryapur youth murder) : दर्यापूर शहरातील आनंद नगर परिसरात किरकोळ वादातून एका युवकाची भर दिवसा हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर येथील रहिवासी प्रज्वल तायडे (वय 19) हा दुपारच्या सुमारास आपल्या घरी एकटाच असताना काही अज्ञात व्यक्तींनी घरात येऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी प्रज्वलवर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, “शहरात कायद्याचा धाक राहिला नाही का?” असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सदर घटनेची (Daryapur youth murder) माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

Related to this topic: