Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

पद्मावती मासरुळ धरण

पद्मावती मासरुळ धरणात २५ ते ३० % टक्के पाणीसाठा

Padmavati Masarul Dam: पद्मावती मासरुळ धरणात २५ ते ३०% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मराठवाडा-विदर्भातील ३२ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.


पद्मावती मासरुळ धरणात २५ ते ३०  टक्के पाणीसाठा

Padmavati Masarul Dam |

 

परिसरातील गावांची तहान भागविणार...

बुलडाणा (Padmavati Masarul Dam) : तालुक्यातील मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेलं पद्मावती मासरूळ धरण या धरणावरून मराठवाडा व विदर्भातील गावांना पाणीपुरवठा होत आहे परिसरातील ३२ गावाची पाणीपुरवठा योजना असून सध्या मासरुळ , धामणगाव, सोयगाव,पांगरखेड,वरुड जामठी ,तराडखेड,गुम्मी, पारध , पद्मावती,वालसावंगी,सुंदरवाडी अशा दहा ते पंधरा गावांचा पाणीपुरवठा या धरणातून सुरळीत सुरू आहे. (Padmavati Masarul Dam) धरणाची पातळी सुद्धा खोल आहे. काही गावातील ग्रामपंचायत चा नियोजन शून्य कारभार असल्यामुळे त्या गावांना पावसाळ्यात सुद्धा पाणीटंचाई भासते.  तरी धरणात मुबलक पाणीसाठा आहे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही.

या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचे संकट सध्या तरी भासत नाही या धरणावरून (Padmavati Masarul Dam) पाणीपुरवठ्यासाठी विहीरी खोदकाम केलेल्या आहे त्या विहिरींना पक्के पाणी आहे आज रोजी पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे पाणी निघत नाही धरणाची पातळी ५ % टक्क्यावर आली असतांना सुद्धा पाणीपुरवठा करणाऱ्याविहिरीच्या पाण्याचा तुटवडा येत नाही. या धरण (Padmavati Masarul Dam) परिसरात प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत काही विहिरी धरणातुन अद्याप उघड्या सुद्धा पडल्या नाही.  इतका पाणीसाठा मासरूळ पद्मावती धरणात शिल्लक आहे.