Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

सद्यःस्थितीत केवळ ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया !

शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असताना भांडीवाडी येथे अद्यापही केवळ ८०० मेट्रिक टन कचऱ्यावरच प्रकिया होत असल्याची माहिती उजेडात आली आहे.


सद्यःस्थितीत केवळ ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया

Waste Management |

स्थायी समिती अन् आरोग्य समिती सभापर्तीकडून भांडेवाडी परिसराची पाहणी

नागपूर (Waste Management) : शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असताना भांडीवाडी येथे अद्यापही केवळ ८०० मेट्रिक टन कचऱ्यावरच प्रकिया होत असल्याची माहिती उजेडात आली आहे. स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी वखरे आणि वैद्यकीय व आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांनी शुक्रवारी भांडेवाडी परिसराची पाहणी केली.पाहणीत त्यांना उपरोक्त माहिती प्राप्तझाली आहे.

स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी यावेळी भांडेवाडीस्थित महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी वरिष्ठ नगरसेवक प्रदीप पोहणे, शारदा बराई यांच्यासह उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

प्राप्त माहितीनुसार शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. सध्या सुसबिडीच्या माध्यमातून २५०-३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. आता नवीन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यामुळे या नव्याने कचऱ्याचे ढिगारा निर्माण होणार नाही आणि जुन्या कचऱ्यावरसुद्धा प्रक्रिया सुरू आहे. परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी शिवानी दाणी-वखरे आणि मनीषा अतकरे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करीत प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेतली. यावेळी भूमी ग्रीन प्रा. लि. कंपनीचे विजय टिळेकर, पंकज पासनकर, श्रीकृष्ण दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती दिली. विशेष म्हणजे, पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे.

Related to this topic: