GST Notice: मराठी व्यापारीला त्याच्या आधार आणि पॅन कार्डचा वापर करून बोगस कंपनीतून 105 कोटीचा व्यवहार झाल्याचे उघड झाले. त्याला जीएसटीची 23 कोटीची नोटीस मिळाली.
वसमत येथील दुकानदारा च्या नावावर परस्पर 105 कोटीचा व्यवहार
पॅनकार्ड आधारकार्ड वापरून बोगस कंपनी स्थापन
वसमत (GST Notice) : येथील ठक्कर कॉम्प्लेक्स परिसरात छोटेसे इलेक्ट्रिक दुकान चालवणाऱ्या तरुणाला तब्बल 23 कोटी 30 लाख रुपयांची जीएसटीची नोटीस आली त्याच्या पॅन कार्डवर 105 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे संबंधित तरुणाचे आधार कार्ड पॅन कार्ड वापरून परस्पर कंपनी स्थापन करून ही फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे बँकेने अकाउंट होल्ड केल्याने हा प्रकार उजेडात आला आहे याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कंपनी चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसमत येथील पावरलूम परिसरातील रहिवासी व ठक्कर कॉम्प्लेक्स येथे छोटेसे इलेक्ट्रिक दुकान चालवणाऱ्या राजेश दुमाने यांचे वसमत येथील (GST Notice) एसबीआय शाखेत खाते आहे त्याचा व्यवहारात व्यवहार जेमतेम वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपये पर्यंत आहेत मात्र बँकेने 2 जानेवारी रोजी त्याच्या खात्यावर होल्ड लावला. दुमाने बँकेत गेले असता बँकेत त्यांना 23 कोटी 30 लाख रुपयांचा जीएसटी थकीत असल्याने होल्ड लागला असल्याचे सांगण्यात आले दरम्यान त्यांना 23 कोटी 30 लाख रुपयांची जीएसटीची नोटीसही प्राप्त झाली त्यानंतर मात्र त्यांचे हातपाय गळाले वर्षाकाठी जेमतेम तीन लाख रुपयांचा व्यवहार असताना प्रचंड मोठ्या रकमेची नोटीस कशी आली हे समजत नव्हते त्यामुळे त्यांनी हिंगोली येथे जीएसटी कार्यालय गाठून चौकशी केली असता मियापूर जिल्हा हैदराबाद राज्य तेलंगणा येथे त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरून कंपनी स्थापन आहे.
त्या कंपनीमार्फत 29 जुलै 2023 ते तारीख 1 जानेवारी 2026 या कालावधीत तब्बल 105 कोटी 29 लाख 40 हजार दोन रुपयांचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आणि या व्यवहारापोटी 23 कोटी रुपयांची जीएसटीची नोटीस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याने या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी राजेश दमाने यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांना हा प्रकार सांगितला.
वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून शनिवारी रात्री उशिरा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (GST Notice) अजब प्रकाराने खळबळ उडाली असून एका सर्वसामान्य व्यापारी तरुणाला घरबसल्या एवढी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे हा गुन्हा घडलेला असल्याने पोलिसांनी प्रकरण हैदराबाद पोलिसांकडे वर्ग केले आहे.
या संदर्भात राजेश दुमाने यांच्याशी संपर्क साधला असता त्याने आपण कंपनीत कामाला असताना आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स दिल्या होत्या ओरिजनल आपल्याकडेच आहेत त्या वापरून ही कंपनी स्थापन करून हा व्यवहार झाला असावा असे त्यांनी सांगितले बँकेने खात्यावर होल्ड लावल्यापासून गेले तीन महिने आपण त्रस्त आहोत सर्व संबंधित अधिकारी विभागाशी भेटून व्यथा मांडत आहोत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास कसा लागेल हे समजण्यास मार्ग नाही मात्र विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आपल्या खात्यावर एवढा मोठा व्यवहार झाल्याने आपण टॅक्स देणारे आहोत हे सिद्ध होत आहे त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही माझे सिबिल या प्रकरणामुळे खराब झाले आहे व्यवहारावर परिणाम होत आहे त्यामुळे काही न करता विनाकारण त्रास सहन करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
आधार कार्ड पॅन कार्ड चे झेरॉक्स वापरून परस्पर कंपनी स्थापन करून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करण्याचे प्रकरण उजेडात झाल्याने सर्वसामान्य धास्तावले आहेत हा एकच प्रकार आहे का असे अजून किती प्रकार झालेत हे समजण्यास मार्ग नाही एवढा मोठा प्रकार करणाऱ्यामागे मोठे रॅकेट असू शकते यातून अनेकांची फसवणूक झालेली असू शकते यातील आरोपी सापडले तरच सर्व काही समजणार आहे सर्वसामान्यांना विविध कामासाठी आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स द्यावे लागतात त्याचा असा परस्पर उपयोग करून फसवणूक होऊ शकते यातून कसे वाचायचे हा प्रश्न आहे.