Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

पाथरी नगर परिषद

परभणीतील पाथरी नगर परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी, विरोधक आमने सामने

Pathari Municipal Council: पाथरी नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे सभा वादग्रस्त झाली.


परभणीतील पाथरी नगर परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधक आमने सामने

Pathari Municipal Council |

परभणीतील पाथरी न.प.ची सभा ठरली वादळी

ठराम मंजूर म्हणत नगराध्यक्षांनी बैठक संपल्याची केली घोषणा

पाथरी (Pathari Municipal Council) : नगर पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विकास कामांच्या ठरावावरून शुक्रवार २७ मार्च रोजी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने बैठक वादळी ठरली. विरोधकांनी ठरावावर मतदान घेण्याची जोरदार मागणी केली, मात्र नगराध्यक्षांनी ती फेटाळत ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करत बैठक संपल्याचे घोषित केले. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता पहिली  सर्वसाधारण सभा न.प. सभागृहात सुरू झाली. सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैठकीस सत्ताधारी पक्षाचे सर्व  तर विरोधी काँग्रेसचे  सर्वनगरसेवक उपस्थित होते.मुख्याधिकारी रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार मानवत न.प. मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र मानवत नगरपालिकेची बैठक याच दिवशी व वेळेत असल्याने त्यांनी आपले अधिकार पाथरी न.प. चे कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुम्बरे यांना लेखी आदेशाद्वारे दिले. दरम्यान स्वीकृत सदस्य तथा माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी अर्थसंकल्पीय बैठकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

यावर नगराध्यक्ष आसेफ खान यांनी १६ मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीस विरोधी सदस्य अनुपस्थित होते, त्यामुळे तो विषय आता घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले.यानंतर शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी ठराव पटलावर मांडण्यात आला. या ठरावावर दुर्राणी यांनी आक्षेप घेत मतदान घ्यावे अशी मागणी केली. विरोधकांनीही हात वर करून मतदानाची मागणी कायम ठेवली. मात्र नगराध्यक्षांनी  मतदान घेण्यास नकार देत ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. विरोधक शहराच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप करत नगराध्यक्षांनी बैठक संपल्याचे जाहीर केले आणि सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत सत्ताधारी सदस्यही बाहेर गेले.

दरम्यान, बाबाजानी दुर्राणी यांच्यासह काँग्रेसचे इतर १२ सदस्य यानंतरही बराच वेळ सभागृहातच बसून होते. वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते. पहिलीच सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरल्याने शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

बहूमताने ठराव मंजूर
 पिठासीन अधिकारी म्हणून मला विशेष अधिकार प्राप्त आहेत. सदर बैठकीत सत्ताधारी गटाचे १२ सदस्य, मी स्वतः नगराध्यक्ष आणि मला प्रदान करण्यात आलेल्या एका अतिरिक्त सदस्यत्वाच्या अधिकारासह एकूण १४  मते ठरावाच्या बाजूने मिळाली. त्यामुळे १४ विरुद्ध १३ अशा बहुमताने सभागृहाच्या पटलावर ठेवलेला ठराव मंजूर करण्यात आला.
- आसेफ खान, नगराध्यक्ष  पाथरी न.प.

विकास कामासाठी प्राप्त निधीची माहिती दिली नाही
सर्वसाधारण सभेत विकासकामे, निधी वापर, निविदा प्रक्रिया, तसेच  कामकाजाबाबत  आरोप  केले.सभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये विविध विकास कामांसाठी प्राप्त निधीची माहिती देण्यात आली नसल्याचे स्विकृत सदस्य तथा माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

एलईडीद्वारे नागरीकांनी पाहिले थेट सभेचे कामकाज
पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सामान्य नागरिकांना पाहता यावे यासाठी प्रथमच पालिका परिसरात एलईडी स्क्रीन लावून बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी पाथरीकरांनी  सभागृहातील घडामोडी प्रत्यक्ष अनुभवत पाहिल्या.

Related to this topic: