Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ट्रॅक्टर-बलेनो अपघात

ट्रॅक्टर आणि बलेनो कारची समोरासमोर धडक; वाहनाचे अतोनात नुकसान

Tractor-Baleno accident: जळगाव जिल्ह्यातील मानोरा-कारंजा रोडवर २० मेला ट्रॅक्टर व बलेनो कारच्या समोरासमोर धडकेमुळे दोन्ही वाहनात गंभीर नुकसान झाले


ट्रॅक्टर आणि बलेनो कारची समोरासमोर धडक वाहनाचे अतोनात नुकसान

Tractor-Baleno accident |

मानोरा (Tractor-Baleno accident) : तालुक्यातील मानोरा- कारंजा रोडवरील भोयनी फाटाजवळ  दि. २० मे रोजी ट्रॅक्टर व बलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याने वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही.

सविस्तर असे की, मौजे दापुरा येथील ट्रॅक्टर कुटार घेऊन जात असताना मानोरा - कारंजा रोडवरील भोयनी फाटा जवळ मानोराकडे जाणाऱ्या बलेनो कार व ट्रॅक्टर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनाचे अतोनात नुकसान झाले असुन सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. या समोरासमोर झालेल्या दोन वाहनाच्या जबर धडकेत ट्रॅक्टरचा पुढचा चक्का निघून बाहेर पडला आहे तर बलेनो कार समोरून पूर्णपणे चेपली आहे. या (Tractor-Baleno accident) अपघातात काही जण किरकोळ जखमी झाल्याचे प्राथमिक स्तरावर माहिती मिळाली आहे. 

Related to this topic: