Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

तृतीयपंथीयांच्या नावातील भिन्नतेबाबत उपाययोजना करा!

राज्य अन्न आयोगाच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यात भूकमुक्ती व भिकमुक्ती कार्यक्रमास पाठबळ मिळत असून राज्यातील अनेक तृतीयपंथीयांना शिधापत्रिका मिळणे आता सुलभ झाले आहे.


तृतीयपंथीयांच्या नावातील भिन्नतेबाबत उपाययोजना करा

Transgender Ration Card Issue |

राज्य अन्न आयोगाची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे मागणी

लातूर (Transgender Ration Card Issue) : राज्य अन्न आयोगाच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यात भूकमुक्ती व भिकमुक्ती कार्यक्रमास पाठबळ मिळत असून राज्यातील अनेक तृतीयपंथीयांना शिधापत्रिका मिळणे आता सुलभ झाले आहे. दरम्यान तृतीयपंथीयांना शिधापत्रिका देण्यात त्यांच्या नावाचा अडसर येत असून तृतीयपंथीयांकरीता असलेल्या स्वतंत्र कल्याण मंडळांने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एडवोकेट महेश ढवळे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 130 पेक्षा अधिक तृतीयपंथी व्यक्तींना शासकीय अन्नधान्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब मांडण्यात आली. 2022 साली वितरित करण्यात आलेल्या शिधा पत्रिका अद्याप वापरात नसून, तांत्रिक अडचणी, बायोमेट्रिक नियम व माहितीच्या अभावामुळे अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहिले आहेत. याबाबत किन्नर विकास परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना अन्न व नागरी पुरवठा संदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन देत अडचणी मांडल्या.

या अनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्या घटकांमध्ये तृतीयपंथीयांचा देखील समावेश होतो. जन्मापासून तृतीयपंथीयांना त्यांच्या जन्मदात्याचे नाव प्राप्त होते. मात्र वाढत्या वयानंतर त्यांची सामाजिक ओळख निर्माण होताना त्यांना त्यांच्या गुरुच्या नावाने ओळखले जाते व नावामध्ये तसा बदल होतो. मात्र शासनाच्या योजना घेताना त्यांची दोन नावे समोर येत असल्याने अडचणी येत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ देताना अशी अडचण निर्माण होत असल्याने अनेक जणांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. महामार्ग, अनेक चौकामध्ये, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मंदिरे आधी ठिकाणी मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी भिक्षा मागताना आढळून आले आहेत. आपले भिकमुक्तीचे व भूकमुक्तीचे प्रयत्न सुरू असून राज्यांना आयोगाने त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कोल्हापूर येथे तृतीयपंथीयांकरिता स्वतंत्र शिधावाटप दुकान देण्याचे आदेश आयोगाने दिले व राज्यातील पहिले तृतीयपंथी याकरिता स्वतंत्र शिधावाटप दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र कल्याण मंडळाचे आपण पदसिद्ध अध्यक्ष असून नाव भिन्नतेमुळे कोणताही तृतीयपंथी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी कल्याण मंडळाद्वारे उपाययोजना कराव्यात अशी विनंती या पत्रात अ‍ॅडव्होकेट ढवळे यांनी केली आहे.