Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > पुणे

पुणे–सुपौल एक्स्प्रेसमध्ये प्रसूती; RPF जवानांच्या तत्परतेने आई-बाळ सुरक्षित

पुणे–सुपौल एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेत रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका नवजात बाळाचा सुरक्षित जन्म झाला आणि आई-बाळ दोघांचाही जीव वाचला.


पुणे–सुपौल एक्स्प्रेसमध्ये प्रसूती rpf जवानांच्या तत्परतेने आई-बाळ सुरक्षित

Train Birth Story |

पुणे (Train Birth Story) : पुणे–सुपौल (बिहार) एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान घडलेल्या एका हृदयस्पर्शी आणि थरारक घटनेत रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका नवजात बाळाचा सुरक्षित जन्म झाला आणि आई-बाळ दोघांचाही जीव वाचला.

रोक्साना खातून (वय 28) या आपल्या पतीसोबत पुणे–सुपौल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून बिहारकडे प्रवास करत होत्या. प्रवास सुरळीत सुरू असताना पुण्याहून दौंडच्या पुढे ट्रेन जात असताना त्यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. रेल्वेमध्ये कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती गंभीर बनली. काही क्षणांतच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि सहप्रवाशांमध्ये घबराट पसरली.

या घटनेची माहिती मिळताच डब्यात उपस्थित प्रवाशांनी तात्काळ रेल्वे सुरक्षा दलाला माहिती दिली. काही वेळातच RPF चे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजित काकडे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही जवानांनी अत्यंत शांतपणे आणि संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली. त्यांनी महिलेला धीर दिला आणि प्रवाशांच्या मदतीने डब्यातच आवश्यक तात्पुरती व्यवस्था केली.

वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही जवानांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित प्रसूतीसाठी मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच बाळाचा रडण्याचा आवाज डब्यात घुमला आणि संपूर्ण वातावरणात असलेला तणाव क्षणार्धात आनंदात बदलला. प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडत दोन्ही जवानांचे कौतुक केले.

यानंतर रेल्वे अहिल्यानगर स्थानकावर थांबल्यानंतर आई आणि नवजात बाळाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली.

या घटनेमुळे RPF जवानांच्या मानवतावादी भूमिकेचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वेसारख्या आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि दाखवलेली संवेदनशीलता यामुळे एक अनमोल जीव सुरक्षितपणे जगात आला, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.