Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

'फोनची वाट पाहत राहिली'...शेवटी चिठ्ठी लिहून विवाहितेचा अंत ..., नागपूर हादरलं

नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून महादुला (कोराडी) परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


फोनची वाट पाहत राहिलीशेवटी चिठ्ठी लिहून विवाहितेचा अंत  नागपूर हादरलं

Suicide Case |

प्रेम, वेदना आणि शेवट… मयुरीच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा

नागपूर (Suicide Case) : नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून महादुला (कोराडी) परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयुरी मेंढे असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या माहेरीच आयुष्य संपवले. या घटनेमागे वैवाहिक आयुष्यातील तणाव कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी आणि तिच्या पतीमध्ये काही काळापासून सतत वाद होत होते. या कौटुंबिक कलहामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. सुमारे महिनाभरापूर्वीच ती माहेरी परतली होती. त्यानंतरही तिने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ती अधिकच निराश झाली होती.

घटनेच्या दिवशी घरातील सदस्य बाहेर गेले असताना मयुरीने एकटीच टोकाचे पाऊल उचलले. तिने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेपूर्वी तिने पतीस उद्देशून एक भावनिक चिठ्ठी लिहिली होती. “मी तुमच्यावर खूप प्रेम करते…” अशा आशयाच्या शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त करत मनातील वेदना मांडल्याचे सांगितले जात आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून तिचा तपासात महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

दरम्यान, संध्याकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर मयुरी दरवाजा उघडत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पतीकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक तणावातून उद्भवणाऱ्या अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Related to this topic: