Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा

हिंगोली येथे ६ जून रोजी भव्य ‘शिवकुटुंब मेळावा’; नियोजन बैठकीत १०० कुटुंबांच्या सहभागाचा निर्धार

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जून २०२६ रोजी हिंगोली येथे आयोजित ‘शिवकुटुंब मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


हिंगोली येथे ६ जून रोजी भव्य ‘शिवकुटुंब मेळावा’ नियोजन बैठकीत १०० कुटुंबांच्या सहभागाचा निर्धार

Shivkutumb Melava |

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

हिंगोली (Shivkutumb Melava) : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जून २०२६ रोजी हिंगोली येथे आयोजित ‘शिवकुटुंब मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर आज प्राथमिक नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, विविध उपक्रम, नियोजन व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या मेळाव्यात किमान १०० कुटुंबांचा सहभाग असावा, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवविचारांचा प्रसार व समाज प्रबोधन हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असणार आहे.

पुढील नियोजनासाठी रविवार, दि. २४ मे रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून, मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आजच्या बैठकीस खंडेराव सरनाईक, डॉ. नामदेव कोरडे, पंडित अवचार, पंडित सिरसाठ, राजकुमार वायचाळ, महेश राखोंडे पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related to this topic: