Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

दुरूस्तीच्या नावावर  महामार्गावर मलमपट्टी

सिरोंचा - कालेश्वर महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत  दै. देशोन्नतीने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.


दुरूस्तीच्या नावावर  महामार्गावर मलमपट्टी

Poor Road Condition |

अपघाताचे प्रमाण कायम, वरीष्ठ अधिकार्‍यांची डोळेझाक

सिरोंचा (Poor Road Condition) : सिरोंचा - कालेश्वर महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत  दै. देशोन्नतीने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेऊन  दुरूस्तीस प्रारंभ करण्यात आला. मात्र दुरूस्तीच्या नावावर रस्त्यावर मलमपट्टी   करण्यात आल्याने   संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गाची योग्यरितीने दुरूस्ती करण्यात न आल्याने  अपघाताचे प्रमाण कायमच असल्याचे दिसुन येत आहे. मात्र वरीष्ठ अधिकार्‍यांनी याकडे डोळेझाक केली असल्याचा आरोप होत आहे.

दैनिक देशोन्नतीने बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला जाग घेऊन त्या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.मात्र डांबर टाकून व्यवस्थित मार्ग दुरूस्त करून द्यायचा होता. मात्र त्या ठिकाणी मोठी बॉर्डर गिट्टी टाकून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे  बांधकाम सुरू असताना कुठल्याही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दिसून आले नाहीत . या  ठिकाणी अनेक अपघात सुद्धा झाले आहेत.

यासोबतच भगवंतराव महाविद्यालय समोर असलेल्या पुलाच्या ठिकाणी पण चार चाकी वाहन वेगाने गेले तर जबरदस्त धक्का बसून वाहने खराब होऊन त्या ठिकाणी मोठी अपघात घडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी पण संबंधित अधिकारी किंवा ठेकेदारांनी लक्ष द्यावे अन्यथा मोठा  अपघात होण्याचा धोका व्यक्त होत आहे. दै. देशोन्नतीमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी  संदेश नायक यांनीही कंत्राटदारास  फोन करून रस्ता  दुरूस्त करून देण्यास सुचविले होते हे विशेष.

Related to this topic: