Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पेट्रोल-डिझेल बंद ?

पेट्रोल-डिझेल बंद होणार? अफवेमुळे कळमनुरी शहरातील पंपांवर तुफान गर्दी

Petrol-Diesel Crisis: कळमनुरीत पेट्रोल व डिझेल बंद होण्याच्या अफवामुळे नागरिकांमध्ये घबराट उद्भवली, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा दिसून आल्या.


पेट्रोल-डिझेल बंद होणार अफवेमुळे कळमनुरी शहरातील पंपांवर तुफान गर्दी

Petrol-Diesel Crisis |

साठेबाजीला उधाण

कळमनुरी (Petrol-Diesel Crisis) : कळमनुरी शहरात पेट्रोल व डिझेल बंद होणार असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. दि. २५ मार्चच्या दुपारपासूनच शहरातील दोन्ही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. वाढती गर्दी पाहता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पंप मालकांनी पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर रात्री उशिरा परिस्थिती हाताळण्यासाठी काही काळ पेट्रोल पंप बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



अफवेच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात (Petrol-Diesel Crisis) पेट्रोल व डिझेल खरेदी करून साठा करण्यास सुरुवात केली आहे. कॅन, बाटल्या आणि इतर भांड्यांमध्ये इंधन भरून नेण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यामुळे भविष्यात इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन काळाबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दि.२६ मार्च रोजीही परिस्थितीत फारसा बदल दिसून आला नाही. दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंप परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.

मर्यादित इंधन वाटपाचा निर्णय व तणावपूर्ण परिस्थिती

जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानंतर शहरातील पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्तात इंधन वाटप करण्यात येत आहे. नव्या नियमानुसार प्रति ग्राहक पेट्रोल फक्त 100 रुपयांचे तर डिझेल 2000 रुपयांपर्यंत देण्यात येत आहे. दरम्यान, (Petrol-Diesel Crisis) पेट्रोल-डिझेल खरेदीदरम्यान नागरिकांचा रोष वाढत असल्याने काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पंप चालकांनी पोलिसांना पाचारण केले व पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरच इंधन विक्री पुन्हा सुरू करण्यात आली.

Related to this topic: