Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर शहरात रमजान ईदच्या तयारी

पातूरमध्ये रमजान ईदसाठी वाढीव सोयी-सुविधांची मागणी

पातूर शहर काँग्रेस कमिटीने ईदच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी-सुविधांसाठी नगर परिषदेला निवेदन दिले. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.


पातूरमध्ये रमजान ईदसाठी वाढीव सोयी-सुविधांची मागणी

पातूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी पातूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात ईदगाह व परिसराची स्वच्छता करण्यासोबतच शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करावी, बंद पडलेले स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करावेत, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच वाहतूक व्यवस्थेची योग्य सोय करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरातील कब्रिस्तानाचीही स्वच्छता करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या प्रसंगी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हिदायत खान, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद, माजी सरपंच शब्बीर अली, माजी सरपंच बब्बू भाई, मो. हयात जमदार, मो. महताब पहलवान, अनीक पटेल, मो. शाकीर, सै. नईम, मो. शारीक, सै. ईरफान, मो. आरिफ, इनायत खान, मो. खिराजोद्दीन, ताहेर पहलवान, शेख इरफान, सलाउद्दीन, शेख मुख्तार यांच्यासह शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: