Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

पत्रकला जनबंधू निधन

दुःखाचा डोंगर कोसळला: पत्रकला जनबंधू यांचे कर्करोगामुळे निधन

Patrakala Janbandhu Passed Away: कोरची तालुक्यातील प्रतिनिधी लालचंद जनबंधू यांच्या पत्नी पत्रकला जनबंधू यांचे कर्करोगामुळे निधन झाले. दहा महिन्यांपासून त्या कर्करोगावर उपचार घेत होत्या.


दुःखाचा डोंगर कोसळला पत्रकला जनबंधू यांचे कर्करोगामुळे निधन

Patrakala Janbandhu Passed Away |

कोरची (Patrakala Janbandhu Passed Away) : येथील तालुका प्रतिनिधी लालचंद जनबंधू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांची पत्नी पत्रकला जनबंधू (५३) यांचे रविवारी रात्री कर्करोगामुळे निधन झाले. पत्रकला या गेल्या दहा महिन्यांपासून नागपूर येथील 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे वैद्यकीय प्रशासक डॉ. आनंद पाठक यांच्या देखरेखीखाली, पोटातील 'अँट्रम' आणि 'पायलोरस' या भागांमधील कर्करोगाशी लढा देत होत्या. त्यांच्या (Patrakala Janbandhu Passed Away) पोटातील ५.७ सेमी लांबीच्या गाठीमध्ये 'कार्सिनोमा सिग्नेट रिंग' (Carcinoma signet ring) या प्रकारचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते.

सुरुवातीला त्यांच्यावर अठरा वेळा केमोथेरपी, तीन वेळा इम्युनोथेरपी आणि दोन वेळा 'फॉल्फॉक्स' (Folfox) उपचार करण्यात आले; परंतु दुर्दैवाने, 'फॉल्फॉक्स' उपचारांचा ताण त्या सहन करू शकल्या नाहीत आणि रविवारी रात्री स्वतःच्याच निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आतड्यांमधून अन्न पुढे जावे यासाठी नागपूर येथील डॉ. अमित अग्रवाल यांनी त्यांच्या शरीरात 'स्टेन्ट'ही बसवला होता; मात्र सलग तीन महिने उलट्या होत राहिल्यामुळे त्यांना तीव्र रक्तक्षय (ॲनिमिया) झाला.

तसेच, स्नायूंची ताकद क्षीण होणे, दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होणे यांसारखे त्रास सुरू झाले. मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांना उभे राहणे, चालणे, बसणे, तसेच खाणे-पिणेही अशक्य झाले होते. त्यांच्या( Patrakala Janbandhu Passed Away) पश्चात नितेश (२९) आणि अंकेश (२६) हे दोन मुलगे आहेत. त्यांच्यावर कोरची येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे होत्या त्यांच्या निधना बद्ल हळहळ व्यक्त होत आहे.

Related to this topic: