Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी एसआयआर काम

परभणीत तीन दिवसात एसआयआरचे काम संपवा; अन्यथा कारवाई

Parbhani SIR work: पुढील तीन ते चार दिवसात सर्व बिएलओ यांच्याकडून एसआयआरचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यंत्रणांची मदत घ्यावी, नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना सहभागी करुन घ्या


परभणीत तीन दिवसात एसआयआरचे काम संपवा अन्यथा कारवाई

Parbhani SIR work |

 

महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांचा आढावा बैठकीत कर्मचार्‍यांना इशारा

परभणी (Parbhani SIR work) : पुढील तीन ते चार दिवसात सर्व बिएलओ यांच्याकडून एसआयआरचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यंत्रणांची मदत घ्यावी, नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना सहभागी करुन घ्या, कामामध्ये कुचराई केल्यास संबंधित बिएलओ विरुध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिला.
 
बुधवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसिलदार संदीप राजापूरे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम, गजानन जाधव, अल्केश देशमुख, मोहम्मद जावेद यांच्यासह बिएलओ, सुपरवायझर यांची उपस्थिती होती. या बैठकीत एसआयआर मॅपिंगमध्ये उत्कृष्ट काम केलेले महापालिकेचे कर्मचारी मुजीब रहेमान, जालिंदर कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील सर्व प्रभागात उर्वरित मॅपिंगचे काम पूर्ण करुन घ्यावे, यासाठी नागरीकांनी बिएलओ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुपरवायझर आणि बिएलओ यांनी घरोघरी जावून मॅपिंगचे काम पूर्ण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. कामामध्ये कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

नागरिकांनी मॅपिंग करुन घ्यावी
नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर बुथ अधिकारी यांना संपर्क करुन माहिती द्यावी. (Parbhani SIR work) आपली आणि परिवारातील सदस्यांची मॅपिंग करुन घ्यावी, असे अवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.