Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी अवैध पिस्टल

परभणीत अवैध पिस्टलसह एक जण पोलिसांच्या ताब्यात...!

Parbhani illegal pistol: परभणीतील नानलपेठ पोलिसांनी अवैध पिस्टल व जिवंत काडतुसे असलेल्या युवकाला ताब्यात घेतले. यावेळी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे जप्त करण्यात आली.


परभणीत अवैध पिस्टलसह एक जण पोलिसांच्या ताब्यात

Parbhani illegal pistol |

परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात नानलपेठ पोलिसांची कारवाई

परभणी (Parbhani illegal pistol) : शहरातील नानलपेठ पोलिसांनी शुक्रवार २७ मार्च रोजी  दुपारी धाडसी कारवाई करत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणार्‍या एका युवकाला ताब्यात घेतले. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील खंडोबा बाजार परिसरात नानलपेठ पोलिसांनी अवैध शस्त्रविरोधात (Parbhani illegal pistol) मोठी कारवाई करत एकाला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी गोपनीय माहितीच्या आधारे  नानलपेठ पोलिसांचे पथक खंडोबा बाजार परिसरात गस्त घालत होते. यावेळी शासकीय आरोग्य केंद्र परिसरात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शेख सिकंदर शेख मोसीन (वय २७, रा. वांगी रोड, परभणी) असे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत ९ एमएम काडतुसे आढळून आली.

जप्त करण्यात आलेल्या (Parbhani illegal pistol) पिस्टलची किंमत सुमारे २५ हजार रुपये असून काडतुसे प्रत्येकी २ हजार रुपये किमतीची आहेत. असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चौकशीत आरोपीने सदर पिस्टल मध्य प्रदेशातील प्रदीप चौहान याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पांडुरंग सानप  यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम व भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पोलीस हवालदार इरशाद सय्यद, पोलीस शिपाई शोहेब पठाण, पोलीस कर्मचारी संतोष सानप यांच्या पथकाने केली.

Related to this topic: