Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी इंधन निर्बंध

परभणी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल विक्रीवरील निर्बंध मागे

Petrol-Diesel Crisis: परभणी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, अनावश्यक गर्दी टाळण्याचा प्रयत्न.


परभणी जिल्ह्यात पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध मागे

Petrol-Diesel Crisis |

जिल्हा पुरवठा विभागाचा निर्णय; मुबलक इंधनसाठा उपलब्ध

रभणी (Petrol-Diesel Crisis) : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे. यातून पेट्रोलपंपावरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे काल गुरूवार २६ मार्च रोजी घेतलेला निर्णय काही तासांतच मागे घेण्यात आला.

पेट्रोल व डिझेल (Petrol-Diesel Crisis) विक्रीच्या अनुषंगाने निर्बंध लावण्यात येऊन दुचाकी वाहनामध्ये २०० रूपये आणि तीन चाकी आणि चारचाकी वाहनामध्ये २ हजार रूपये पर्यंत इंधन भरण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. परंतू सदरील आदेशाने इंधन टंचाईबाबत नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याने गुरूवार २६ मार्च रोजी घेण्यात आलेले आदेश तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आले.

जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल (Petrol-Diesel Crisis) मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊन पेट्रोल पंपावर  अनावश्यक गर्दी न करता आवश्यकतेनूसार इंधन भरण्याचे आवाहन तसेच खुले कॅन, बाटली, डब्बा विक्री न करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी कायम ठेवले आहेत.

Related to this topic: