Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी गुन्हा दाखल

परभणीत वृध्द आई- वडिलांना रस्त्यावर सोडले; मुलगा,सुनेवर गुन्हा

Parbhani case registered: वृध्द आई- वडिलांचा सांभाळ व संरक्षणाची जबाबदारी असताना त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आले. पिडित वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा आणि सुनेविरुध्द ज्येष्ठ नागरीक


परभणीत वृध्द आई- वडिलांना रस्त्यावर सोडले मुलगासुनेवर गुन्हा

Parbhani case registered |

 

पूर्णा तालुक्यातील पिंपरण येथील घटना चुडावा पोलिसात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani case registered) : वृध्द आई- वडिलांचा सांभाळ व संरक्षणाची जबाबदारी असताना त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आले. पिडित वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा आणि सुनेविरुध्द ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम अंतर्गत चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिमराव जयंता धुतराज यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीला दोन मुलं आहेत. फिर्यादीचा लहाना मुलगा आणि सुन मुंबई येथे वास्तव्यास आहेत. सुन शासकीय सेवेत असून मुलगा इंजिनिअर आहे.  काही दिवसापूर्वी फिर्यादी व त्यांच्या मोठ्या मुलाने जमा केलेले सहा लाख रुपये छोट्या मुलाला दिले होते. लहान मुलगा आणि सुन सांभाळ करत नसल्याने या बाबत ज्येष्ठ नागरीक कल्याण न्यायाधिकरण यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेंव्हा या अर्जावर सुनावणी होत आई- वडिलांना प्रतिमाह ३ हजार रुपये देण्या बाबत आदेश देण्यात आले.

या (Parbhani case registered) आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात आला. त्यानंतर संबंधित मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्याचे पत्रक काढण्यात आले. आई- वडिलांचा सांभाळ न केल्या प्रकरणी धम्मपाल धुतराज, विभा धुतराज यांच्यावर चुडावा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.