Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

स्थानिक गुन्हे शाखेची जंबो कारवाई; १४ लाखांपेक्षा अधिक किमतीची ७०३ अवैध शस्त्रे जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल १४ लाख ४ हजार ३०० रुपये किमतीची ७०३ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत.


स्थानिक गुन्हे शाखेची जंबो कारवाई १४ लाखांपेक्षा अधिक किमतीची ७०३ अवैध शस्त्रे जप्त

Operation Crackdown |

नांदेड (Operation Crackdown) : स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल १४ लाख ४ हजार ३०० रुपये किमतीची ७०३ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत तलवारी, खंजर, चाकू आणि फायटरचा समावेश असून, वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार २२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना शहरातील ‘३०० सालाना शॉपिंग प्लाझा’ येथील दुकान क्रमांक ८ मध्ये रणजितसिंघ सरदार हा व्यक्ती विनापरवाना व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रांचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला.

या कारवाईत पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ रविशंकर बामणे, उमर शेख, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कौठेकर, चंद्रकांत स्वामी, अझरुद्दीन शेख, अनिल बिरादार, राजवंतसिंघ बंगई यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी या कारवाईत ४७० तलवारी, २०९ खंजर, चाकू तसेच २४ फायटर असा एकूण १४ लाख ४ हजार ३०० रुपये किमतीचा ७०३ शस्त्रांचा साठा जप्त केला.

या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी रणजितसिंघ सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी) याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Related to this topic: