Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून खून; विवाहित प्रेयसीने प्रियकराचा गळा आवळला

प्रेमसंबंधातून एकत्र राहणाऱ्या तरुणाचा विवाहित प्रेयसीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरात उघडकीस आली आहे.


नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून खून विवाहित प्रेयसीने प्रियकराचा गळा आवळला

Murder Case |

नाशिक (Murder Case) : प्रेमसंबंधातून एकत्र राहणाऱ्या तरुणाचा विवाहित प्रेयसीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरात उघडकीस आली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि अनैतिक संबंधांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अमोल पंढरीनाथ दांडगे (वय २६, रा. हनुमानवाडी, पंचवटी) या तरुणाचा मृत्यू झाला असून संशयित आरोपी म्हणून सोनाली राजेंद्र गायकवाड (वय ३६, रा. नवनाथनगर) हिला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात आणखी दोन महिलांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमोल हा अविवाहित होता, तर सोनाली विवाहित आहे. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या नात्याला अमोलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, घरच्यांचा विरोध न जुमानता अमोलने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी स्वतःचे घर सोडले आणि पेठरोडवरील नवनाथनगर परिसरातील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत राहण्यास सुरुवात केली होती.

सोनाली हीला अमोलचे दुसऱ्या एक बाईसोबत संबंध असल्याचं समजलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. अशा स्थितीत सोनालीने अमोलचा काटा काढण्याचा ठरवलं. यासाठी तिने एक प्लॅन तयार केला. अमोल हा शरीराने रांगडा होता. त्यामुळे त्याला मारण्यासाठी सोनालीने या प्लॅनमध्ये आपली जाव आणि मैत्रिणीला सामावून घेतलं. त्यानुसार मंदाबाई गायकवाड, आणि वैशाली खरात यांची तिने मदत घेतली.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून तसेच अनैतिक संबंधांवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात सोनालीने अज्ञात वस्तूच्या सहाय्याने अमोलचा गळा आवळल्याचा आरोप आहे. यात अमोलचा गुदमरून मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर सोनालीने स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी बनाव रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अमोल बेशुद्ध पडल्याचे सांगत तिने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांना ‘अमोलला चक्कर आली आणि तो पडला’ असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तपासणीदरम्यान अमोलच्या गळ्यावर आढळलेल्या काळ्या व्रणांमुळे डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

यानंतर शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी सोनालीचा बनाव उघड करत तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी अमोलचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या हत्येमागे नेमका आर्थिक व्यवहार काय होता, तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्याकांडाची शहरभर चर्चा सुरू आहे.

Related to this topic: