Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

मार्च एंडिंगचा जोर: सुट्टीच्या दिवशीही हिंगोली जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय गजबजले

आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने, शासकीय स्तरावर कामांचा मोठा उरक सुरू आहे.


मार्च एंडिंगचा जोर सुट्टीच्या दिवशीही हिंगोली जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय गजबजले

March Ending Work |


​हिंगोली (March Ending Work) : आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने, शासकीय स्तरावर कामांचा मोठा उरक सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर  शनिवार सुट्टीचा दिवस असतानाही हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय पूर्णवेळ सुरू असल्याचे पहायला मिळाले. जिल्हा नियोजनमधील विविध विकासकामांचा निधी आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त दिसून आले.

​जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आणि नियोजन

मार्च महिनाअखेर (मार्च एंडिंग) असल्याने विकासकामांचा निधी वेळेत खर्ची पडणे आणि नियोजित कामे पूर्ण करणे आवश्यक असते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि जिल्हा नियोजन अधिकारी अ . द.  लव्हारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली शनिवारी कार्यालयातील कामकाज सुरू ठेवण्यात आले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची लगबग

साधारणपणे शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट असतो, मात्र शनिवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा नियोजन विभागात चित्र वेगळे होते. मार्च एंडिंगच्या ताणामुळे विकासकामांची देयके (Bills) काढणे, प्रलंबित फाईल्सचा निपटारा करणे आणि नियोजित निधीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व कर्मचारी सकाळपासूनच कामावर हजर होते. जिल्हा नियोजन अधिकारी लव्हारे स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे कोणताही निधी परत जाणार नाही.
​जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाचा लेखाजोखा वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागातील कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही दाखवलेल्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Related to this topic: