Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा ‘भडका’

जिल्हात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा दावा जरी जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात असला,तरी ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी गॅस एजन्सी समोर रांगा लावाव्या लागत आहे.


जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा ‘भडका’

LPG Shortage |

व्यावसायीक ठिकाणांवर भरारी पथकाचे धाडसत्र

यवतमाळ (LPG Shortage) : जिल्हात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा दावा जरी जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात असला,तरी ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी गॅस एजन्सी समोर रांगा लावाव्या लागत आहे. सिलेंडर मिळविण्यासाठी ग्राहकांच्या लागणार्‍या रांगा ह्या गॅस सिलेंडर तुटवड्याचा ‘भडका’उडाला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून घरगुती सिलेंडरची साठेबाजी करणार्‍यांवर धाडसत्र सुरु केले आहे.

जिल्हात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा (LPG Shortage) नसल्याचा दावा तरी जिल्हाधिकारी व त्यांचे प्रशासन करीत असले तरी मागील आठ दिवसांमध्ये गॅस तुटवड्याचे संकट अधिक गडद झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ७ लाख ७१ हजार व्यावसायीक,उज्वला योजना व घरगुती ग्राहक आहेत,या ग्राहकांना यापूर्वी गॅस एजन्सीकडून सिलेंडरचा पुरवठा नियमित पणे केल्या जातो,मागील दहा ते पंधरा वर्षांचा जरी विचार केला,तरी आपल्याला कधीही सिलेंडर मिळविण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले नाही,किंवा घरगुती ग्राहकांवर ‘ब्लॅक’मध्ये सिलेंडर विकत घेण्याची वेळ आली नाही. मात्र इराण व इस्त्राईल च्या युध्दाच्या कालावधीतच नागरिकांवर अशी वेळ का येवून ठेपली,यावरून गॅसच्या तुटवड्याच्या सामना ग्राहकांना करावा लागत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यातून शासन व जिल्हा प्रशासनाच्या कथनी व करणीत अंतर असल्याची जाणीव होवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी कधीही गॅस तुटवड्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्याची वेळ आली नव्हती.

व्यावसायीक सिलेंडरवर यापूर्वी कधीही बंदी घालण्यात आली नव्हती,सिलेंडरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी यापूर्वी प्रशासनाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर मिळण्याच्या दिवसांवरही यापूर्वी निश्चित कालावधी करीता निर्बंध लादण्यात आलेले नव्हते. तसेच व्यावासायीकांकडून होणार्‍या घरगुती गॅसच्या वापरावर आजच्या प्रमाणे यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरु करण्यात आलेले नव्हते. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांमध्ये गॅस टंचाईचे संकट अधिक तीव्र होवू लागले असून यवतमाळ शहरामध्ये आता गॅस सिलेंडर मिळविण्याकरीता ग्राहकांच्या रांगा लागू लागल्या आहेत.त्यामुळे निश्चित जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा भडका उडल्याचे उद्भवलेल्या परिस्थिीतीवरून दिसून  येत आहे.

Related to this topic: